रणजित निंबाळकरांचा दावा ऐकून भाजपचे वरिष्ठसुद्धा हसले असतील!

जे फुटून गेले त्यांचं काय होतं हे निंबाळकर यांनी सातारा जिल्ह्यात पाहिले असेल
रणजित निंबाळकरांचा दावा ऐकून भाजपचे वरिष्ठसुद्धा हसले असतील!

पुणे: "राष्ट्रवादीचे 9 आमदार आपल्या संपर्कात आहेत, असा दावा करणाऱ्या खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांचे स्टेटमेंट ऐकून भाजपचे वरिष्ठसुद्धा हसले असतील," अशी खिल्ली राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते विकास लवांडे यांनी उडवली आहे.

"भाजप पक्षात आपले महत्त्व वाढवण्यासाठी खासदार निंबाळकर यांची धडपड सुरू आहे. पण त्यांचे हे स्टेटमेंट हास्यास्पद आहे. त्यांचे स्टेटमेंट वाचून आम्हाला हसू आलेच पण त्यांच्या पक्षातील वरिष्ठ हसले असतील," असे लवांडे म्हणाले.

"राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार हे शरद पवार यांच्यावर प्रेम करणारे आमदार आहेत. ते आमदार एकनिष्ठ आहेत. त्यामुळेच आम्हाला आमचे आमदार कोणत्याही हॉटेलमध्ये ठेवावे लागले नाहीत. राष्ट्रवादी काँग्रेसमधून कोणीही फुटून जाणार नाही आणि जे फुटून गेले त्यांचं काय होतं हे निंबाळकर यांनी सातारा जिल्ह्यात पाहिले असेल," असाही टोला लवांडे यांनी लगावला.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com