संजय शिंदे हे गद्दार, त्यांची अवस्था उदयनराजेंसारखी होईल!

संजय शिंदे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचा पाठिंबा मिळावा म्हणून नेत्यांचे उंबरे झिजवले.
संजय शिंदे हे गद्दार, त्यांची अवस्था उदयनराजेंसारखी होईल!

पुणे : "संजय शिंदे राष्ट्रवादी काँग्रेसमुळे आमदार झाले आणि निवडून आल्यावर ते भाजपसोबत गेले. शिंदे यांना कोणतीही विचारधारा नाही. ते संधीसाधू आणि गद्दार आहेत. या गद्दाराला लोक धडा शिकवतील," असा इशारा राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते विकास लवांडे यांनी दिलाय.

करमाळा विधानसभा मतदारसंघात तिरंगी लढतीत बाजी मारलेल्या संजय शिंदे यांना निवडणुकीत राष्ट्रवादीची मदत झाली आहे. त्यांनी अपक्ष म्हणून निवडणूक लढवली पण त्यांना राष्ट्रवादी काँग्रेसने जाहीर पाठिंबा दिला. तिथले राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार संजय पाटील यांनी पक्षाच्या आदेशावरून शिंदे त्यांचा प्रचार केला. निवडणुकीत विजय मिळवल्यावर मात्र शिंदे यांनी भाजपला पाठिंबा दिला.

शिंदे यांनी पाठिंबा दिल्यावर लवांडे यांनी प्रतिक्रिया दिली. "उदयनराजे भोसले यांनी राष्ट्रवादी काँग्रेस सोडली. भाजपात गेले. लोकांनी त्यांना धडा शिकवला. संजय शिंदे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचा पाठिंबा मिळावा म्हणून नेत्यांचे उंबरे झिजवले. विनवण्या केल्या. निवडून आल्यावर मी राष्ट्रवादी काँग्रेससोबत राहीन.' असा शब्द त्यांनी वारंवार दिला होता. आम्ही मदत केली म्हणून ते आमदार झाले. पण आता त्यांनी गद्दारी केली आहे. अशा गद्दार माणसाला लोक धडा शिकवतील" असे लवांडे म्हणाले. 
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com