भूषण गगराणी आणि विकास खरगे मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव

भूषण गगराणी यांनी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे प्रधान सचिव म्हणूनही काम केले.
Kharge-Gagrani appointed in CMO
Kharge-Gagrani appointed in CMO

मुंबई  : राज्याच्या मुख्यमंत्री पदाची सूत्र हाती घेतल्यानंतर उद्धव ठाकरे यांनी प्रशासनात फेरबदल करायला सुरुवात केली आहे. त्याचाच भाग म्हणून त्यांनी आज मुख्यमंत्री कार्यालयाचे प्रधान सचिव पदावर भूषण गगराणी आणि वन विभागाचे प्रधान सचिव विकास खरगे यांची नियुक्ती केली. 

गगराणी यांनी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे प्रधान सचिव म्हणूनही काम केले.

निपुण विनायक यांची नगरपालिका प्रशासन येथे आयुक्त आणि संचालक या पदावर नियुक्ती केली आहे.  सचिन कुर्वे यांची महाराष्ट्र विमानतळ विकास प्राधिकरणाच्या व्यास्थापाकीय संचालक पदी नियुक्ती केली आहे. आनंद रायते यांची विक्रीकर विभागाच्या सहआयुक्त पदावर नियुक्ती केली आहे. 

 माहिती व तंत्रज्ञान विभागाचे संचालक अमोल येडगे यांची अमरावती जिल्हापरिषद मुख्य कार्यकारी अधिकारी या पदावर  करण्यात आली आहे .  के एच बगते,  अतिरिक्त जिल्हाधिकारी , सरदार सरोवर प्रकल्प नंदुरबार यांची रत्नागिरी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी पदावर नियुक्ती केली आहे.
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com