आजचा वाढदिवस : विजयसिंह पंडित - माजी जिल्हा परिषद अध्यक्ष.  - vijaysinha pandit ex zp president | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

राजीव सातव यांच्या पार्थिवावर सोमवारी (ता. 17 मे) रोजी सकाळी दहा वाजता कळमनुरी (जि. हिंगोली) येथे अंत्यसंस्कार होणार.
राजीव सातव यांचे कोरोनाने निधन

आजचा वाढदिवस : विजयसिंह पंडित - माजी जिल्हा परिषद अध्यक्ष. 

सरकारनामा ब्युरो
बुधवार, 21 नोव्हेंबर 2018

जिल्हा परिषद सदस्य असलेले विजयसिंह पंडित हे ज्येष्ठ नेते शिवाजीराव पंडित यांचे धाकटे चिरंजीव व राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश

जिल्हा परिषद सदस्य असलेले विजयसिंह पंडित हे ज्येष्ठ नेते शिवाजीराव पंडित यांचे धाकटे चिरंजीव व राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश
सरचिटणीस अमरसिंह पंडित यांचे धाकटे बंधू आहेत. गेवराई पंचायत समिती सदस्य व सभापती म्हणून त्यांची राजकीय कारकीर्द सुरू झाली. जिल्हा परिषदेच्या सभापतीपदासह गेवराई पंचायत समितीच्या रिक्त असलेल्या सभापतिपदावरही काम करण्याची संधी त्यांना भेटली. दुष्काळात शेतकऱ्यांना मार्गदर्शन आणि समुपदेशन कक्ष स्थापन करणारी बीड राज्यातील पहिली जिल्हा परिषद ठरली होती. युवकांच्या संघटनासाठी ते स्वाभिमानी युवक आघाडी, विजयसिंह पंडित मित्रमंडळाच्या माध्यमातून काम करतात. आगामी निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून गेवराई विधानसभा मतदार संघातून निवडणूक लढण्याची त्यांची तयारी सुरू आहे. 
 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख