भाजप आमदारांनी निराधारांची फसवणूक केली : पंडित बंधूंचा हल्लाबोल

गेवराई नगर परिषद भ्रष्टाचाराचे स्मारक होत आहे. आमदारांनी निराधारांची फसवणूक केल्याचा आरोप माजी आमदार अमरसिंह पंडित व माजी जिल्हा परिषद अध्यक्ष विजयसिंह पंडित यांनी केला. लक्ष्मण पवार हे गेवराईचे आमदार असून नगर परिषदेवरही त्यांचीच सत्ता आहे.
pandits-.
pandits-.

बीड :" मोर्चानंतरही निराधारांना पगार सुरु झाले नाहीत तर  न्यायालयात जाऊ. गेवराई नगर परिषद भ्रष्टाचाराचे स्मारक होत असून आमदारांनी निराधारांची फसवणुक केली. आजचा मोर्चा निराधारांना पगार मिळवुन देण्यासाठी आहे, कोणाचे पगार बंद करण्यासाठी नाही ,"असा हल्लाबोल राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस व माजी जिल्हा परिषद अध्यक्ष विजयसिंह पंडित यांनी केला. 

विविध प्रश्नांवर सोमवारी गेवराईत मोर्चा काढण्यात आला. यानंतर झालेल्या सभेत पंडित बंधू बोलत होते. भाजपचे लक्ष्मण पवार हे गेवराईचे आमदार असून नगर परिषदही त्यांच्याच नेतृत्वाखाली आहे.  

निराधारांना तात्काळ पगार सुरु करावी, मराठा आरक्षण आंदोलनकर्त्यांवरील गुन्हे मागे घ्यावेत, हमी भावाने खरेदी केलेल्या तुर, हरबरा व मुगाचे थकीत चुकारे व्याजासह द्यावेत,  हातगाडे व्यवसायिकांना संरक्षण द्यावे, पंचायत समिती मधील गैरव्यवहाराची चौकशी करावी, थकीत पिक विमा नुकसान भरपाई वाटप करावी आदी मागण्यांसाठी निराधार, विधवा, वयोवृद्ध महिला, शेतकरी, युवक आणि अपंग आदींच्या सहभागाने विजयसिंह पंडित यांच्या नेतृत्वाखाली मोर्चा निघाला. 

तहसिलदार प्रल्हाद लोखंडे यांनी निवेदन स्विकारले. यानंतर समारोप सभेत अमरसिंह पंडित, विजयसिंह पंडित, बाबुराव गाडे, धम्मपाल कांडेकर, सुभाष नागरे यांची भाषणे झाली. 

गेवराई महसुल मंडळातील कापुस उत्पादक शेतकऱ्यांना विम्याचे पैसे मिळाले नाहीत. यावर गप्प असणारे सत्ताधारी गुत्तेदारीचे आणि कामाचे अमिष दाखवुन पक्ष प्रवेश देण्यात मश्शगुल असल्याचा आरोप अमरसिंह पंडित यांनी केला. 

गेवराई नगर परिषद केवळ गुत्तेदारांना पोसण्यासाठी आहे. वाळु, रेशन आणि केरोसिनचा गैरव्यवहार कोण करत आहे हे जनता जाणते. दिल्ली पासुन गल्ली पर्यंत सत्ता असतांनाही निष्क्रीय आमदाराला एक सिंचन प्रकल्प मंजुर करता आला नाही असा आरोप विजयसिंह पंडित यांनी केला. 

तालुक्यातील विधवा, अपंग आणि निराधार महिलांना वर्षभरापुर्वी मंजुरी पत्र देवुनही त्यांना पगार सुरु केला नाही, या निराधारांची फसवणुक करण्याचे पाप आमदारांनी केल्याचा घणाघातही त्यांनी केला.  सिंचन विहिरी, घरकुलांसाठी सामान्यांकडून दलाली घेतली जाते, जनावरांच्या छावण्यांमध्ये पार्टनरशिप असते असा आरोपही त्यांनी केला. 
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com