विजयदादांची दोषमुक्ती नाहीच; न्यायालयाने अर्ज फेटाळला! 

माजी उपमुख्यमंत्री मोहिते- पाटील संचालक असलेल्या करकंब (ता. पंढरपूर) येथील विजय शुगरने २०१४-१५ च्या गळीत हंगामासाठी श्री विठ्ठल सहकारी साखर कारखान्याकडील अतिरिक्त ऊस गाळपासाठी नेला होता.
vijaysinh mohite patils application rejected by pandharpur court
vijaysinh mohite patils application rejected by pandharpur court

पंढरपूर : गुरसाळे येथील श्री विठ्ठल सहकारी साखर कारखान्याकडून विजय शुगर्समध्ये गाळपासाठी नेलेल्या उसाचे पैसे देण्याबाबत चालढकल केल्याच्या कारणावरून विजय शुगर्सचे संचालक तथा माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते- पाटील यांनी या प्रकरणातून आपल्याला दोषमुक्त करण्याचा दाखल केलेला अर्ज पंढरपूर येथील न्यायालयाचे न्या. ए. पी. कराड यांनी मंगळवारी फेटाळला. 

माजी उपमुख्यमंत्री मोहिते- पाटील संचालक असलेल्या करकंब (ता. पंढरपूर) येथील विजय शुगरने २०१४-१५ च्या गळीत हंगामासाठी श्री विठ्ठल सहकारी साखर कारखान्याकडील अतिरिक्त ऊस गाळपासाठी नेला होता. ऊस गाळप आणि दराचा करार दोन्ही कारखान्यांत झाला होता. उसाची किंमत, वाहतूक खर्च आणि अन्य खर्च सरकारी नियमानुसार गुरसाळे येथील विठ्ठल सहकारी साखर कारखान्याच्या सभासदानुसार ऊस देण्याचा लेखी करार उभय कारखान्यात झाला होता. परंतु, विजय शुगरने गाळपास नेलेल्या उसाची रक्कम १५ दिवसांत दिली नाही. विठ्ठल कारखान्याला ती रक्कम देणं बंधनकारक असल्याने त्यांनी बॅंकेकडून कर्ज घेऊन ती सभासदांना दिली. 

दरम्यान, विजय शुगरने पाच कोटी ९४ लाख ७३ हजार ७६२ चा धनादेश २० मे २०१६ रोजी दिला. मात्र, तो धनादेश वटला नाही. यानंतर श्री विठ्ठल कारखान्याने विजय शुगर्सच्या सर्व संचालकांच्या विरोधात पंढरपूर न्यायालयात फौजदारी गुन्हा दाखल केला. त्या वेळी मोहिते-पाटील यांनी या आधीच आपण संचालकपदाचा राजीनामा दिला आहे. या तक्रारीशी माझा काहीच संबंध नाही. त्यामुळे या केसमधून आपल्याला दोषमुक्त करण्याची मागणी केली होती. तसेच कार्यकारी संचालक झुंजार आसबे यांनीही २०१६ मध्ये आपण राजीनामा दिला असल्याने आपलेही नाव वगळावे असा अर्ज केला होता. पण दोघांचा अर्ज न्यायालयाने फेटाळला.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com