जयंतराव म्हणतात, "" मोहिते-पाटील अद्याप राष्ट्रवादीत ! 

जयंतराव म्हणतात, "" मोहिते-पाटील अद्याप राष्ट्रवादीत ! 

पुणे : राज्याचे माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते-पाटील हे अजुनही राष्ट्रवादीत आहेत. त्यांनी अद्याप पक्षाचा राजीनामा दिलेला नाही, असे स्पष्टीकरण राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी पुण्यात दिले.

सध्या भारतीय जनता पार्टीच्या व्यासपीठावर जाणारे मोहिते पाटील यावर काय भूमिका घेणार याची चर्चा राष्ट्रवादीसह भाजपतही सुरू झाली आहे. 

विजयसिंह मोहिते-पाटील वगळता त्यांचे चिरंजीव तसेच कुटुंबातील अन्य सदस्यांनी लोकसभा निवडणुकीपूर्वी भाजपात प्रवेश केला. लोकसभा निवडणुकीनंतर विधानसभा निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर कॉंग्रेस-राष्ट्रवादीतील अनेक दिग्गज भाजपात प्रवेश करीत आहेत.

सोलापूर येथे गेल्या आठवड्यात झालेल्या महाजनादेश यात्रेच्या दुसऱ्या टप्प्याच्या समारोप मेळाव्याला भाजपा अध्यक्ष अमित शहा उपस्थित होते. यावेळी व्यासपीठावर विजयसिंह मोहिते-पाटील व्यासपीठावर उपस्थित होते. 

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भाषणात त्यांचा विशेष उल्लेखदेखील केला होता. विजयसिहांच्या संपूर्ण कुटुंबाने भाजपात प्रवेश केला आहे. मात्र, स्वत: मोहिते-पाटील यांचा अद्याप अधिकृतपणे भाजपा प्रवेश झालेला नाही. त्यामुळे तांत्रिकदृष्टया अद्यापही ते राष्ट्रवादीत आहेत. त्यामुळेच जयंत पाटील यांनी मोहिते-पाटील यांच्याबाबत जाणीवपूर्वक स्पष्टीकरण दिले आहे. 

पाटील यांच्या या स्पष्टीकरणानंतर मोहिते-पाटील राष्ट्रवादीचा राजीनामा नेऊन भाजपात अधिकृत प्रवेश करणार की जैसे थे राहणार याबाबत उत्सुकता आहे. भाजपाच्या वाटेवर असलेले कॉंग्रेसचे माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी दोन दिवसांपूर्वी अकलूज येथे जाऊन मोहिते-पाटील यांची भेट घेतली.

त्यामुळे कॉंग्रेस-राष्ट्रवादीतून भाजपात प्रवेश करणाऱ्या नेत्यांच्या मार्गदर्शकाच्या भूमिकेत असलेले मोहिते-पाटील स्वत: अधिकृत प्रवेश कधी करणार याचीच चर्चा सोलापूर जिल्ह्याच्या आणि राज्यात राजकीय वर्तुळात सुरू आहे. 
 

 
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com