फडणवीस पुन्हा मुख्यमंत्री व्हावेत म्हणून मंत्री देशमुखांचे नृसिंहाला साकडे  

..
Deshmukh-Prays-for-Fadanvis
Deshmukh-Prays-for-Fadanvis

नीरा नरसिंहपूर :  मुख्यमंत्रिपदावर देवेंद्र फडणवीस यांची लवकरात लवकर शपथविधी व्हावा, यासाठी कुलदैवत श्री लक्ष्मी नृसिंहास महापूजा घालून साकडे घालण्यात आले.

नीरा नरसिंहपूर (ता. इंदापूर) येथील श्री लक्ष्मी नृसिंह देवस्थान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कुटुंबीयांचे कुलदैवत आहे. त्यामुळे राज्यात महायुतीचे सरकार स्थापन होऊन मुख्यमंत्री म्हणून पुन्हा देवेंद्र फडणवीस यांचा शपथविधी व्हावा, यासाठी सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री विजयकुमार देशमुख यांनी श्री लक्ष्मी नृसिंहचरणी महापूजा घालून प्रार्थना करून साकडे घातले.

 राज्यात शिवसेनेने आणि संजय राऊत यांनी भाजपसमोर मोठे आव्हान उभे केलेले असताना देवेंद्र फडणवीस यांचे समर्थक विविध स्तरावर प्रयत्न करीत आहेत . पालकमंत्री यांनी मात्र थेट देवाकडे धाव घेऊन थेट देवालाच साकडे घातले आहे. 

पौरोहित्य मुख्यमंत्र्यांचे पुजारी कमलेश डिंगरे व लक्ष्मीकांत डिंगरे यांनी केले. या वेळी सोलापूर महानगरपालिकेचे नगरसेवक जयकुमार पाटील, गजानन गवई, प्रसाद कुलकर्णी, नरसिंहपूरच्या सरपंच कांचन डिंगरे, दशरथ राऊत, अमर भोसले, संजय कोळी उपस्थित होते.
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com