कोपरगावचे नगराध्यक्ष विजय वहाडणे विधानसभेच्या मैदानात

आत्तापर्यंत त्यांनी 42 गावातून विविध लोकांशी चर्चा करून सुप्त प्रचार चालू केला आहे.
कोपरगावचे नगराध्यक्ष विजय वहाडणे विधानसभेच्या मैदानात

कोपरगाव (नगर) : आमदार होण्यासाठी तालुक्यातील अनेकांनी आत्तापासूनच गुडघ्याला बाशिंग बांधले आहे. त्या दृष्टीने  नगराध्यक्ष विजय सूर्यभान वहाडणे यांनी तालुक्यातील 42 गावे पिंजून काढली असून अपक्ष उमेदवार म्हणून प्रचार सुरु केला आहे . 

मध्यंतरी नगरपालिका निवडणुकीत थेट जनतेतून नगराध्यक्ष निवडणुकीत अपक्ष विजय वहाडणे हे तब्बल 9 हजार मतांनी निवडून आले. वहाडणे यांनी कोल्हे यांच्यावर सतत टीकास्त्र सोडले. आमदार स्नेहलता कोल्हे पालिकेत हस्तक्षेप करीत मला काम करू देत नसल्याचे वहाडणे यांनी सतत ओरड केली. त्यामुळे वहाडणे यांनी देखील आमदारकीसाठी उभे राहावयाचे ठरवले आहे. वहाडणे सध्या भाजपातून निलंबित आहेत. मात्र भाजप आपल्या रक्तात असल्याचे नेहमी सांगतात. मुख्यमंत्री फडणवीस पासून अनेक मंत्र्यापर्यंत आपले संबध असल्याचे ते बोलतात. सध्या वहाडणे यांनी तालुक्यातील ग्रामीण भागात लक्ष केंद्रित केले असून कार्यकर्त्यासह गाठीभेटी सुरु केल्या आहेत. आत्तापर्यंत त्यांनी 42 गावातून विविध लोकांशी चर्चा करून सुप्त प्रचार चालू केला आहे.  

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com