`छाननी'वर वडेट्टीवारांनी अधिक बोलणे टाळले 

माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आणि राष्ट्रीय सचिव मुकुल वासनिक कॉंग्रेसचे निष्ठावान नेते आहेत. गांधी घराण्यांशी त्यांची जवळीक आहे. माजी प्रदेशाध्यक्ष व मुख्यमंत्री अशोक चव्हाण, विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते विजय वड्डेट्टीवार यांनाही छाननीतून दूर ठेवण्यात आले आहे.
विजय वड्डेटीवार
विजय वड्डेटीवार

नागपूर - माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आणि राष्ट्रीय सचिव मुकुल वासनिक कॉंग्रेसचे निष्ठावान नेते आहेत. गांधी घराण्यांशी त्यांची जवळीक आहे. माजी प्रदेशाध्यक्ष व मुख्यमंत्री अशोक चव्हाण, विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते विजय वड्डेट्टीवार यांनाही छाननीतून दूर ठेवण्यात आले आहे. 

राज्यातील गटातटाच्या राजकारणामुळे पक्षश्रेष्ठींनी प्रमुख नेत्यांना दूर ठेवल्याचे बोलले जात आहे. विधानसभेचे उमेदवार निवडण्यासाठी कॉंग्रेसने स्थापन केलेल्या समितीत प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांचा अपवाद वगळता कुठल्याचा नेत्यांना स्थान देण्यात आले नसल्याने मोठ्या प्रमाणात नाराजी व्यक्त केली जात आहे. 

विधानसभेतील विरोधीपक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी असे प्रथमच घडल्याचे सांगून यावर अधिक बोलण्याचे टाळले. 

महाराष्ट्रातील विधानसभेसाठी पुढील महिन्यात आचारसंहिता लागण्याची शक्‍यता आहे. जिल्हानिहाय इच्छुक उमेदवारांच्या मुलाखतींचे सोपस्कार कॉंग्रेसने पार पाडले आहेत. प्रदेशच्या प्रमुख नेत्यांचीही बैठक पार पडली. त्यात शहर व जिल्हाध्यक्षांना शॉर्टलिस्ट देण्याच्या सूचना देण्यात आल्या. मात्र राज्यातील नेत्यांमधील मतभेद आणि वैर लक्षात घेता राज्यस्तरावर बहुतांश उमेदवाराच्या नावांवर एकमत होण्याची शक्‍यता नाही. 

हे लक्षात घेऊन कॉंग्रेसच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी यांनी ज्योतिरादित्य सिंधिया यांच्या अध्यक्षतेत छाननी समिती स्थापन केली. त्यात हरीष चौधरी, मानिकम टागोर, कॉंग्रेसचे सचिव व प्रदेश प्रभारी मल्लीकार्जुन खर्गे, प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात आणि के. सी. पडवी यांचा सदस्य म्हणून समावेश करण्यात आला आहे. बाळासाहेब थोरात यांचा अपवाद वगळता छाननी समितीत महाराष्ट्रातील एकाही अनुभवी नेत्यांचा समावेश करण्यात आलेला नाही. त्यामुळे कॉंग्रेसच्या पदाधिकाऱ्यांना आश्‍चर्याचा धक्का बसला आहे. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com