विजय वडेट्टीवारांनी `गुपित` फोडल्याने शिवसेनेत आनंद!

सत्तास्थापनेसाठी दिल्लीतील हालचाली वाढल्या आहेत. पुन्हा बैठकांचे सत्र दोन्ही काॅंग्रेसमध्ये सुरूच राहणार आहे.
vijay vadettivar reveals secret
vijay vadettivar reveals secret

पुणे : राज्यातील सत्तास्थापनेबाबत तीनही पक्ष काय चर्चा सुरू आहे, यावर गुपित बाळगून असताना काॅंग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांनी अचानाकपणे हे गुपित फोडले. मुख्यमंत्रिपदाची पहिली टर्म ही शिवसेनेकडे असू शकते, असे सांगून त्यांनी पहिली अनाहूतपणे घोषणा केली. सर्व वृत्तवाहिन्यांनी त्यांच्या आधारे मग बातम्या चालविल्या.

शिवसेना, काॅंग्रेस आणि राष्ट्रवादी काॅंग्रेस या तीनही पक्षांच्या सरकार स्थापनेबाबत अनेक बैठका सुरू आहेत. सर्व माहिती या सूत्रांच्या आधारे येत आहेत. आघाडीची किंवा सत्तावाटपाची कोणतीही माहिती अधिकृतरित्या सामोरी आलेली नाही. चर्चा कशाच्या मुद्यांवर सुरू आहे, हे अनेक नेते खोदून विचारूनही सांगत नाहीत. सरकार स्थापन होणार की नाही, यावर दोन्ही काॅंग्रेसचे नेते काहीच बोलत नाहीत.

दुसरीकडे संजय राऊत यांनी सरकार स्थापनेसाठी आता एक डिसेंबरचा मुहूर्त सांगितला आहे. राऊत हेच वेगवेगळे दावे रोज करत असले तरी काॅंग्रेसकडून काय प्रतिसाद आहे, याचा बोध होत नव्हता. हा बोध वडेट्टीवार दिल्लीत पत्रकारांशी बोलताना करून दिला.

मुख्यमंत्रिपदाचे काही ठरले आहे का, या प्रश्नावर त्यांनी पहिली टर्म ही शिवसेनेकडे असू शकते, असे सांगितले. विदर्भाला सत्तेत वाटा मिळेल का, या प्रश्नावर त्यांनी संपूर्ण महाराष्ट्रातील जनतेलाच वाटा मिळेल, असे सांंगून त्यांनी वेळ मारून दिली. 

संजय राऊत यांनी पेढे वाटपाची आॅर्डर द्या, असे सांगून सरकार स्थापनेबाबत विश्वास व्यक्त केला आहे. उपमुख्यमंत्रीपद हे काॅंग्रेसकडे असू शकते. मुख्यमंत्रिपदाची दुसरी टर्म ही राष्ट्रवादी काॅंग्रेसकडे देण्याचे धोरण असल्याचे सांगण्यात येत आहे. या तीनही पक्षांच्या स्थापन होणाऱ्या आघाडीच्या नावात धर्मनिरपेक्ष शब्द असावा, असा काॅंग्रेसचा आग्रह आहे. ही शिवसेनेसाठी अडचण असू शकते. मात्र शिवसेनेला कोणी धर्मनिरपेक्षता शिकवू नये, अशी भूमिका घेत संजय राऊत यांनी त्यावरील थेट भाष्ट टाळले. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com