Vijay Vadettiwar Taunt on Prakash Ambedkar | Sarkarnama

'वंचित' भाजपची 'बी' टीम नसली तरी सी...डी...ई...असं काहीतरी नक्कीच आहे : विजय वडेट्टीवार 

सरकारनामा ब्युरो
गुरुवार, 4 जुलै 2019

देशाचे संविधान वाचविण्यासाठी वंचित बहुजन आघाडीने कॉंग्रेससोबत यावे, ही पक्षाची ईच्छा आहे. वैयक्तिक माझीही मनापासून तिच ईच्छा आहे. परंतु, प्रकाश आंबेडकरांची सध्या जी भाषा आहे. त्यावरुन ते आमच्यासोबत येतील असं वाटत नाही.- विजय वडेट्टीवार

नागपूर : देशाचे संविधान वाचविण्यासाठी वंचित बहुजन आघाडीने कॉंग्रेससोबत यावे, ही पक्षाची ईच्छा आहे. वैयक्तिक माझीही मनापासून तिच ईच्छा आहे. परंतु, प्रकाश आंबेडकरांची सध्या जी भाषा आहे. त्यावरुन ते आमच्यासोबत येतील असं वाटत नाही. वंचित आघाडी ही भाजपची 'बी' टीम आहे, असं मी म्हणणार नाही. कारण तसा पुरावा नाही. पण सी, डी, ई, एफ... असं काहीतरी नक्कीच आहे. विधानसभेतही ते लोकसभेप्रमाणे भाजपचाच फायदा करणार, असं दिसतय. एकंदरीतच काय तर 'वंचित'च कदाचित ठरलंय, असा टोमणा विधानसभेचे विरोधी पक्ष नेते विजय वडेट्टीवार यांनी प्रकाश आंबेडकर यांना उद्देशून लगावला

राज्य सरकारचे अखेरचे पावसाळी अधिवेशन संपल्यानंतर वडेट्टीवार आज प्रथमच विदर्भात आले आणि पत्रकारांशी त्यांनी संवाद साधला. ते म्हणाले, "लोकसभा निवडणुकीत वंचितला 6.7 टक्के मते मिळाली आणि आम्हाला 15 टक्‍क्‍यांपेक्षा जास्त मते आहेत. या टक्केवारीचा विचार करुनच त्यांनी अपेक्षा ठेवली पाहीजे. पण त्यांनी 'आम्ही कॉंग्रेसला 40 जागा देतो, त्यांनी विचार करावा', असे नुकतेच म्हटले आहे. त्यामुळे त्यांची मनापासून आघाडीत येण्याची ईच्छा आहे, असे वाटत नाही.''

ते पुढे म्हणाले की, गेल्या साडेचार वर्षांतील अधिवेशनाप्रमाणे हेही एक अधिवेशन होते. एकही समाधानकारक उत्तर सरकारकडून मिळाले नाही. गेल्या 30-35 वर्षांपासून मुंबई महापालिकेत शिवसेना-भाजपची सत्ता आहे. दरवर्षी नाले स्वच्छतेसाठी 125 कोटी रुपये खर्च केले जातात. तरीही दरवर्षी मुंबई पाण्यात बुडते. याला काय म्हणावे, असा प्रश्‍नही त्यांनी केला. पहिल्याच पावसात मुंबईत 36, भिवंडीत 15, रत्नागिरी जिल्यात धरण फुटून 28 जणांचे जीव गेले. हे सर्व सरकारच्या दुर्लक्षाचे बळी आहेत. लोकसभा निवडणुकीच्या यशाच्या धुंदीतून सरकार अद्याप बाहेर पडले नसल्याचा टोला हाणत या सरकारवर 302 चा गुन्हा दाखल केला पाहीजे, अशी भूमिका त्यांनी आक्रमकपणे मांडली. 

हे देखिल वाचा
पडळकर यांच्या आयत्या पिठावर रेघोट्या - लक्ष्मण माने

पडळकरांच्या हातात RSS चा धागा; त्यांनाच आंबेडकरांकडून बळ 

प्रकाश आंबेडकरांनी राजीनामा द्यावा - लक्ष्मण माने

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख