कॉंग्रेसच्या विजय वडेट्टीवारांची नाराजी अखेर दूर

विजय वडेट्टीवार यांना मिळालेल्या खात्यांमध्ये आधी भूकंप पुनर्वसन खाते होते. तर शिवसेनेचे संजय राठोड यांच्याकडे वने, आपत्ती व्यवस्थापन, मदत व पुनर्वसन हे विभाग होते. आता मदत व पुनर्वसन हे खाते वडेट्टीवार यांच्याकडे असणार आहे. दोनच दिवसांपूर्वी विधीमंडळाचे विशेष अधिवेशन पार पडले.
 कॉंग्रेसच्या विजय वडेट्टीवारांची नाराजी अखेर दूर

मुंबई : कॉंग्रेसचे मंत्री विजय वडेट्टीवार यांची नाराजी अखेर दूर झाली असून त्यांच्याकडे मदत व पुनर्वसन खात्याची जबाबदारी देण्यात आली. त्यामुळे वडेट्टीवार यांनी आज मंत्रालयात मंत्रीपदाचा कार्यभार स्वीकारला. कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात रात्री उशिरा बाळासाहेब थोरात दिल्लीत दाखल झाले. त्यांनी कॉंग्रेसच्या के. सी. वेणुगोपाल आणि इतर ज्येष्ठ नेत्यांशी चर्चा केली. त्यानंतर फोनवरुन वडेट्टीवार यांचे पक्षश्रेष्ठींशी बोलणे करुन दिल्यावर वडेट्टीवार यांची नाराजी दूर झाली आहे. शिवसेनेकडे असलेले मदत व पुनर्वसन खाते विजय वडेट्टीवार यांना दिल्यावर त्यांनी पदभारही स्वीकारला. 

विजय वडेट्टीवार यांना मिळालेल्या खात्यांमध्ये आधी भूकंप पुनर्वसन खाते होते. तर शिवसेनेचे संजय राठोड यांच्याकडे वने, आपत्ती व्यवस्थापन, मदत व पुनर्वसन हे विभाग होते. आता मदत व पुनर्वसन हे खाते वडेट्टीवार यांच्याकडे असणार आहे. दोनच दिवसांपूर्वी विधीमंडळाचे विशेष अधिवेशन पार पडले. मात्र नाराजीमुळे विजय वडेट्टीवार यांनी दांडी मारल्याची चर्चा होती. परंतु " कौटुंबिक कारणामुळे मी अधिवेशनाला उपस्थित राहिलो नाही. याची कल्पना मी प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांना दिली, त्यांच्या परवानगीनंतरच मी गैरहजर होतो,' असे वडेट्टीवार यांनी स्पष्ट केले. 

कोल्हापूरचे पालकमंत्रीपद विश्‍वजित कदम यांच्याकडे ? 
कोल्हापूर जिल्हयाचे पालकमंत्रीपद कॉंग्रेसचे राज्यमंत्री विश्‍वजित कदम यांच्याकडे सोपविले जाण्याची शक्‍यता आहे. कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी कोल्हापूरचे पालकमंत्रीपद स्विकारण्यास नकार दिला. राज्यमंत्री सतेज पाटील भंडारा जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत, त्यांच्याकडे कोल्हापूरची जबाबदारी द्यावी का, यावर कॉंग्रेसमध्ये चर्चा सुरू आहे. तर, डॉ. पतंगराव कदम यांचे पुत्र विश्‍वजित कदम राज्यमंत्री आहेत. त्यांना कोल्हापूरचे पालकमंत्री करावे का, याबाबतही कॉंग्रेसमध्ये खलबते सुरू आहेत. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com