ओबीसी विद्यार्थ्यांना शंभर टक्‍के शिष्यवृत्ती :  विजय वडेट्टीवार  

याशिवाय, इमाव, विजाभज व विमाप्र या समाजाच्या विद्यार्थ्यांसाठी सारथी, बार्टी या संस्थांच्या धर्तीवर 'महाज्योती' ही संस्था निर्माण करण्यात येणार असून त्याचे मुख्यालय नागपूर येथे असेल अशी माहितीही त्यांनी यावेळी दिली.
Vijay_Vadettiwar
Vijay_Vadettiwar

मुंबई  : इतर मागास प्रवर्गातील विद्‌यार्थ्यांना सध्या 50 टक्‍के शैक्षणिक शिष्यवृत्ती दिली जाते. त्यामधे वाढ करून सदरची शिष्यवृत्ती 100 टक्‍के करण्याचा सरकारचा मानस असून अर्थविभागाकडे प्रस्ताव दाखल करण्यात आल्याची माहीती इमाव, साशैमाप्र, विजाभज व विमाप्र विभागाचे मंत्री विजय वडेट्टीवार यांनी आज पत्रकार परिषदेत दिली.


याशिवाय, इमाव, विजाभज व विमाप्र या समाजाच्या विद्यार्थ्यांसाठी सारथी, बार्टी या संस्थांच्या धर्तीवर 'महाज्योती' ही संस्था निर्माण करण्यात येणार असून त्याचे मुख्यालय नागपूर येथे असेल अशी माहितीही त्यांनी यावेळी दिली.

 'विजाभज' च्या विद्यार्थ्यांसाठीच्या मॅट्रीकोत्तर प्रलंबित शिष्यवृत्ती तत्काळ देण्यात यावी. 'डीबीटी' योजनेत काही अडचणी असल्यास त्या तत्काळ दूर करुन विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती तत्काळ देण्यात यावी. 'ओबीसी' च्या विद्यार्थ्यांसाठी नवीन वसतीगृहासाठी सध्या भाड्याची इमारत उपलब्ध करुन वसतीगृह सुरु करावेत तसेच वसतीगृहाकरीता कायमस्वरुपी इमारतीसाठी सरकारी जागा निश्‍चित करावी. राज्यात अशी 72 वसतीगृहे उभी करण्यात येणार आहे. 

आश्रमशाळांची गुणवत्ता तपासणी करुन तातडीने अहवाल सादर करा. वसंतराव नाईक तांडा/वस्ती योजनेसाठी निधीची तरतूद केलेली आहे. या योजनेची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी लक्ष द्यावे. इमाव, साशैमाप्र, विजाभज व विमाप्र यांच्यासाठीच्या योजनांची प्रभावीपणे अंमलबजावणी करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी व प्रादेशिक उपायुक्त/सहाय्यक आयुक्त समाज कल्याण यांना दिल्याची माहिती त्यांनी दिली.


या विभागाची सन 2017 मध्ये नव्याने निर्मिती झालेली आहे. त्यामुळे नव्याने विविध योजना विजाभजच्या लाभार्थ्यांसाठी तयार करण्यात आल्या आहेत. अनुसूचित जाती, जमातीच्या विद्यार्थ्यांसाठी 1750 शैक्षणिक अभ्यासक्रमांना शिष्यवृत्ती देण्यात येते.  तेवढ्याच शैक्षणिक अभ्यासक्रमांना इमाव, साशैमाप्र, विजाभज व विमाप्र विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती देण्यासाठी विभागामार्फत प्रयत्न करण्यात येणार आहेत. 


सध्या फक्त 605 अभ्यासक्रमांसाठी शिष्यवृत्ती देण्यात येत आहे. भटक्‍या विमुक्त जमातीतील वडार, रामोशी, नाथजोगी, पारधी व अन्य तत्सम जातींमध्ये अजूनही आर्थिक शैक्षणिक दृष्ट्या मागासलेपण असून त्यांच्या विकासासाठी काही सुविधा उपलब्ध करुन देणे गरजेचे आहे. यासाठी पुढील आठवड्यात यवतमाळ जिल्ह्यातील दुर्गम तांड्यांना भेटी देणार असल्याचेही वडेट्टीवार यांनी सांगितले. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com