vijay vadetiwar birthday | Sarkarnama

आजचा वाढदिवस :  विजय वडेट्टीवार - आमदार (ब्रह्मपुरी, चंद्रपूर)

सरकारनामा ब्युरो
बुधवार, 12 डिसेंबर 2018

गडचिरोलीसारख्या दुर्गम भागातून आलेल्या या विजय वडेट्टीवार या नेत्यांनी विदर्भाच्या राजकारणात एक ओळख निर्माण केली आहे. त्यांचा राजकीय प्रवास शिवसेनेतून सुरू झाला. 1995 मध्ये युती सरकार राज्यात आल्यानंतर महाराष्ट्र वन विकास महामंडळाचे अध्यक्षपद विजय वडेट्टीवार यांना मिळाले तेव्हापासून त्यांचा राजकीय आलेख हा चढत राहिला. गडचिरोली जिल्ह्यातील तिन्ही विधानसभा मतदारसंघ अनुसूचित जमातीसाठी राखीव असल्याने वडेट्टीवार यांनी चंद्रपूर जिल्ह्यातील चिमूर या मतदारसंघावर लक्ष केंद्रित केले. याच मतदारसंघातून ते 2004 मध्ये शिवसेनेचे आमदार म्हणून निवडून आले. नारायण राणे यांचे समर्थक म्हणून त्यांची ओळख होती.

गडचिरोलीसारख्या दुर्गम भागातून आलेल्या या विजय वडेट्टीवार या नेत्यांनी विदर्भाच्या राजकारणात एक ओळख निर्माण केली आहे. त्यांचा राजकीय प्रवास शिवसेनेतून सुरू झाला. 1995 मध्ये युती सरकार राज्यात आल्यानंतर महाराष्ट्र वन विकास महामंडळाचे अध्यक्षपद विजय वडेट्टीवार यांना मिळाले तेव्हापासून त्यांचा राजकीय आलेख हा चढत राहिला. गडचिरोली जिल्ह्यातील तिन्ही विधानसभा मतदारसंघ अनुसूचित जमातीसाठी राखीव असल्याने वडेट्टीवार यांनी चंद्रपूर जिल्ह्यातील चिमूर या मतदारसंघावर लक्ष केंद्रित केले. याच मतदारसंघातून ते 2004 मध्ये शिवसेनेचे आमदार म्हणून निवडून आले. नारायण राणे यांचे समर्थक म्हणून त्यांची ओळख होती. नारायण राणे यांनी शिवसेनेतून कॉंग्रेसमध्ये प्रवेश केला तेव्हा वडेट्टीवार यांनीही शिवसेनेला "जय महाराष्ट्र' केला. त्यांनी कॉंग्रेसकडूनही पुन्हा पोटनिवडणूक जिंकली. त्यानंतर त्यांना विलासराव देशमुख व अशोक चव्हाण यांच्या मंत्रिमंडळातही स्थान मिळाले. सध्या ते विधानसभेतील कॉंग्रेसचे उपनेते असून विदर्भातील पहिल्या फळीतील नेते त्यांची ओळख आहे. 
 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख