शरद पवार-सोनिया गांधींच्या भेटीनंतरच सत्तास्थापनेचा निर्णय - विजय वडेट्टीवार

सत्तास्थापनेबाबत कॉंग्रेस नेत्या सोनिया गांधी आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची लवकरच भेट होणार आहे. या भेटीनंतरच काय तो निर्णय होईल, असे कॉंग्रेसचे नेते आणि ब्रम्हपुरी विधानसभा मतदारसंघाचे आमदार विजय वडेट्टीवार आज म्हणाले.
शरद पवार-सोनिया गांधींच्या भेटीनंतरच सत्तास्थापनेचा निर्णय - विजय वडेट्टीवार

नागपूर - सत्तास्थापनेबाबत कॉंग्रेस नेत्या सोनिया गांधी आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची लवकरच भेट होणार आहे. या भेटीनंतरच काय तो निर्णय होईल, असे कॉंग्रेसचे नेते आणि ब्रम्हपुरी विधानसभा मतदारसंघाचे आमदार विजय वडेट्टीवार आज म्हणाले.

महाराष्ट्रात सध्या उद्‌भवलेल्या स्थितीत तीन पक्षांना एकत्र येऊन सरकार बनवायचे आहे. यातही एक पक्ष हिंदुत्ववादी तर इतर दोन पक्ष सेक्‍युलर आहेत. आणि आम्हाला महाराष्ट्राला पाच वर्ष स्थिर आणि सक्षम सरकार द्यायचे आहे. त्यासाठी प्रत्येक कृती, प्रत्येक निर्णय अभ्यासपुर्ण होणे गरजेचे आहे. शेतकरी आज रडतोय, संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांसाठी सरकार लवकर स्थापन होणे गरजेचे आहे. 

महाशिवआघाडीतील प्रत्येक पक्ष महाराष्ट्राच्या हिताच्या दृष्टीने विचार करत आहे. राज्याला अभिप्रेत असलेला विकास साधण्याचाच प्रयत्न प्रत्येकाचा आहे. त्या दिशेनेच महाशिवआघाडीतील तिन्ही पक्ष कार्य करीत आहेत. 

शरद पवार आणि सोनिया गांधींच्या भेटीनंतर तिन्ही पक्षांचे शिर्षस्थ नेते मिळून सत्तास्थापनेचा निर्णय जाहीर करतील, असे वडेट्टीवार म्हणाले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com