सत्तेवर आल्यावर एका दिवसात बँकाना वठणीवर आणणार : विजय वडेट्टीवार 

सत्तेवर आल्यावर एका दिवसात बँकाना वठणीवर आणणार : विजय वडेट्टीवार 

सत्तेत राहून मलीदा खायचा आणी शेतकऱ्यांविषयी बेगडी प्रेम दाखवायचे असे शिवसेनेचे विचित्र काम सुरू आहे. राज्यातील 25 टक्के शेतकऱ्यांना पीक विमा कर्जाचा लाभ मिळालाच नाही. कॉंग्रेसची सत्ता येऊ द्या, एका दिवसात बँकाना वठणीवर आणणार, असे प्रतिपादन चिमूर येथील शेतकरी भवन येथे आयोजित कॉंग्रेस कार्यकर्ता मेळाव्यात सत्कारास उत्तर देताना राज्याचे विधानसभेचे विरोधी पक्ष नेते विजय वडेट्टीवर यांनी केले.

चिमूर - सत्तेत राहून मलीदा खायचा आणी शेतकऱ्यांविषयी बेगडी प्रेम दाखवायचे असे शिवसेनेचे विचित्र काम सुरू आहे. राज्यातील 25 टक्के शेतकऱ्यांना पीक विमा कर्जाचा लाभ मिळालाच नाही. कॉंग्रेसची सत्ता येऊ द्या, एका दिवसात बँकाना वठणीवर आणणार, असे प्रतिपादन चिमूर येथील शेतकरी भवन येथे आयोजित कॉंग्रेस कार्यकर्ता मेळाव्यात सत्कारास उत्तर देताना राज्याचे विधानसभेचे विरोधी पक्ष नेते विजय वडेट्टीवर यांनी केले.

विदर्भातील ढाण्यावाघ म्हणून ओळखले जाणारे कॉंग्रेसचे माजी मंत्री व विद्यमान आमदार विजय वडेट्टीवार यांची नुकतीच महाराष्ट्र राज्यात विरोधी पक्षनेते नेते म्हणून निवड झाली, तर नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत अख्या महाराष्ट्रात कॉंग्रेस पक्षाचे एकमेव खासदार म्हणून बाळू धानोरकर विजयी झाले. त्यामुळे या दोन्ही नेत्यांचा सत्कार समारंभ व कॉंग्रेस कार्यकर्ता मेळाव्याचे आयोजन चिमूर तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीने शेतकरी भवन चिमूर येथे करण्यात आले. या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून डॉ. अविनाश वारजूकर होते. 

सत्कारास उत्तर देताना विरोधी पक्ष नेते विजय वडेट्टीवार पुढे म्हणाले की, माझ्या राजकीय क्षेत्राच्या यशाची पायाभरणी या क्रांती भूमी चिमूरमध्ये झाली. राज्याचे मुख्यमंत्री राज्यात भाजप सेनेचे २१० जागा निवडून येणार आहेत असे म्हणतात. फडणविसांनी काय भविष्य किंवा कुंडली पाहिली काय ? इव्हिएम मशीन सेट करून केंद्राप्रमाणे राज्यातही सत्तेवर येणार? असा सवाल उपस्थित केला. सर्व समविचारी पक्षांची आघाडी करून राज्याची सत्ता प्राप्त करू असा आत्मविश्वास व्यक्त केला. तेरणे धरण हे खेकडयांनी पोखरल्याने फुटला असे वक्तव्य मंत्र्यांनी केले. मात्र हे धरण खऱ्या खेकड्यांनी फोडले नसून माल खाणाऱ्या खेकडयांनी फोडले आहे, असा टोला युती सरकारला लगावला. 

या वेळी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमेटी सचिव प्रकाश देवतळे, माजी आमदार डॉ. नामदेव उसेंडी, कांग्रेसचे ज्येष्ठ नेते विनोदभाऊ दत्तात्रय, जिल्हा काँग्रेस कमेटी उपाध्यक्ष पंजाबराव गावंडे, कार्यक्रमाचे आयोजक विधानसभा नेते जिल्हा परीषद गटनेते डॉ. सतिश वारजुरकर, तालुका काँग्रेस कमेटी अध्यक्ष माधवबापु बिरजे, जिल्हा परिषद सदस्या ममता डूकरे, संजय डोंगरे, घनश्याम डुकरे, जिल्हा परीषद सदस्य गजानन बुटके, नगराध्यक्ष गोपाल झाडे, पंचायत समीती सभापती विद्या चौधरी, डॉ. संजय  बोढे, पंचायत समीती सदस्य तथा आदी मान्यवर मंचावर उपस्थित होते.

कार्यक्रम प्रंसगी कार्यक्रमाचे आयोजक डॉ. सतिश वारजुरकर, माजी आमदार डॉ. नामदेव उसेंडी यांनीही समयोचित मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक कृषी उत्पन्न बाजार समीतीचे अध्यक्ष माधव बिरजे, संचालन प्रा. राम राऊत यांनी केले. 
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com