विजय शिवतारे माझे सर्वात आवडते मंत्री : आदित्य ठाकरे

विजय शिवतारे माझे सर्वात आवडते मंत्री : आदित्य ठाकरे

सासवड :  राज्यमंत्री विजयबापू शिवतारे हे मंत्रिमंडळातील माझे आवडते मंत्री आहेत.  पुढील पाच वर्षात त्यांच्यावर राज्याची महत्वपूर्ण जबाबदारी सोपवण्यात येणार आहे. त्यांना उच्चांकी मतांनी निवडून देत माझ्यासोबत विधानसभेत पाठवा; असे प्रतिपादन युवासेनेचे अध्यक्ष आदित्य ठाकरे यांनी भेकराईनगर येथे केले आहे. 

पुरंदर विधानसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार व राज्यमंत्री विजय शिवतारे यांच्या प्रचारार्थ आयोजित सभेत ते बोलत होते.

यावेळी माजी आमदार संभाजी कुंजीर, जि.प.चे माजी अध्यक्ष जालिंदर कामठे, शिवसेना हवेलीचे नेते शंकरराव हरपळे, तालुकाप्रमुख संदिप मोडक, उपतालुकाप्रमुख कैलास ढोरे, हवेली भाजपचे अध्यक्ष पंडितदादा मोडक, भाजप सरचिटणीस धनंजय कामठे, राहुल शेवाळे, माजी जि.प सदस्य बाजीराव सायकर, दशरथ काळभोर, सविता ढवळे, रुपाली भाडळे, पं.स.सदस्य राजीव भाडळे, संतोष भाडळे, दादा कोंढरे, शादाब मुलाणी, राजाभाऊ होले, शेतकरी मोर्चाचे केशव कामठे, चकित देशमुख, निर्मला मेमाणे, ज्ञानेश्वर कामठे, सारिका पवार, हनुमंत देशमुख यांच्यासह हजारो नागरिक उपस्थित होते. दरम्यान शिवतारे यांच्यावर मोठी जबाबदारी सोपवण्याचे संकेत यावेळी आदित्य ठाकरे यांनी आपल्या भाषणातून दिले आहेत.  

श्री. ठाकरे म्हणाले, शिवसेनेच्या वचननाम्यात दिलेली आश्वासने पूर्ण करण्यासाठी असतात. शिवतारे यांच्यावर दुष्काळी भागातील पोखरापूर येथील उपसा सिंचन योजनेची जबाबदारी मी सोपवली होती. २० वर्ष ज्या लोकांना कॉंग्रेसला पाणी देता आले नव्हते त्यांना शिवतारे यांनी न्याय दिल्याचे सांगत आदित्य ठाकरे म्हणाले., पुरंदर, भोर आणि वेल्ह्यातील गुंजवणी धरणसुद्धा शिवतारे यांनी पूर्ण केले. मतदारसंघात विविध प्रकल्पांच्या माध्यमातून जवळपास १० हजार कोटींचा निधी आणणारे शिवतारे बहुधा  एकमेव आमदार असावेत, असेही ते म्हणाले.

श्री. शिवतारे म्हणाले, ही शिवसेनेच्या हॅट्ट्रीकची सभा आहे. पुरंदर हवेलीची दहा वर्षापूर्वीची अवस्था आणि आजची अवस्था यात प्रचंड फरक आहे. मतदारसंघ पूर्णपणे विकासकामांनी बदलून गेला आहे. फुरसुंगी उरुळी देवाची ही ९३ कोटींची पाणीयोजना हे माझ्या आयुष्यातील सर्वात मोठे काम मी मानतो. परिसरातील सर्व रस्ते कॉक्रीट करण्यात आले आहेत. मंतरवाडी - खडीमशीन चौक रस्त्याचेही काम जवळपास पूर्ण झाले आहे. विकास कामांच्या जोरावर पुन्हा एकदा पुरंदर हवेलीत भगवाच फडकणार, असेही ते म्हणाले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com