प्रचाराततील `नटबोल्ट`च्या भाषेनंतर शिवतारेंकडून सुप्रियांचे अभिनंदन!

प्रचाराततील `नटबोल्ट`च्या भाषेनंतर शिवतारेंकडून सुप्रियांचे अभिनंदन!

पुणे : बारामती लोकसभा मतदारसंघातून निवडून आल्याबद्दल सुप्रिया सुळे यांचे राज्यमंत्री विजय शिवतारे यांनी फेसबुकच्या माध्यमातून अभिनंदन केले आहे. बारामतीतून तिसऱ्यांना निवडून येऊन हॅट्रिक साधणाऱ्या सुळे यांनी गेल्यावेळच्या जवळपास दुप्पट आघाडी मिळविली आहे. 

`मतभेद आहेत. पुढे पण राहतील. आपण निवडून आलात, आपले अभिनंदन, अशा शब्दांत शिवतारे यांनी शुभेच्छा दिल्या आहेत. खुद्द शिवतारे यांच्या पुरंदर मतदारसंघात सुळे यांनी 25 हजारांचे लिड घेतले आहे. सुळे आणि शिवतारे यांच्या कलगीतुरा प्रचारात गाजला होता. तसेच अजित पवार यांनी शिवतारे हे परत कसे आमदार होतात, हे पाहतो. त्यांना नटबोल्ट नीट करायला नगरला पाठवतो, असा इशारा दिला होता. अजित पवारा यांच्या टिकेला शिवतारे यांनीही तसेच तिखट उत्तर दिले होते.  

प्रचारादरम्यान शिवतारे यांनी पुरंदर मतदारसंघातून कुल यांना अधिक चांगले वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न केला. पुरंदरमधून तब्बल सात टटक्के मतदान अधिक झाले होते. त्यामुळे हे मतदान कुल यांना उपयोगी पडेल, असे वाटत होते. मात्र, प्रत्यक्षात तसे घडले नाही. या पार्श्‍वभूमीवर मतामोजणी दरम्यान सुळे यांचे मताधिक्‍क्‍य वाढत असल्याचे लक्षात येताच शिवतारे यांनी खासदार सुळे यांचे अभिनंदत करून भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

सुप्रिया सुळे विरूद्ध कांचन कुल यांच्यात झालेल्या लढतीत शिवसेनेच्यावतीने शिवतारे यांची भूमिका महत्वपूर्ण राहिली. आमदार म्हणून पुरंदर विधानसभा मतदारसंघाचे नेतृत्व शिवतारे करीत असल्याने या मतदारसंघातून कुल यांना मताधिक्‍य देण्याची जबाबदारी शिवतारे यांच्याकडे होती. मात्र, गेल्यावेळच्या तुलनेत यावेळी भाजपाचे कमळ चिन्ह असूनदेखील कुल यांना यश मिळू शकले नाही. खासदार सुळे यांचा पराभव निश्‍चित आहे, अशी भूमिका शिवतारे प्रचारादरम्यान सातत्याने मांडत होते. मात्र, प्रत्यक्षात तसे घडले नाही. गेल्यावेळीचा अनुभव पाठीशी असल्याने राष्ट्रवादीकडून पुरेशी खबर घेण्यात आली. त्यामुळेच मोदी यांच्या प्रभावी लाटेतही सुप्रिया सुळे चांगल्या मतांनी निवडून आल्या.  
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com