संजय जगतापांनी आपली संपत्ती दान करायले तयार राहावे : विजय शिवतारे

संजय जगतापांनी आपली संपत्ती दान करायले तयार राहावे : विजय शिवतारे

सासवड : कॉंग्रेसचे पुणे जिल्हाध्यक्ष संजय जगताप यांनी स्वतःच जाहीर केल्याप्रमाणे तालुक्याला संपत्ती दान करायला तयार रहावे. न्यायालयीन खटल्यात त्यांनी गुंजवणी प्रकल्प कसा अडकावण्याचा प्रयत्न केला व पाइपलाइनला कसा विलंब केला. याचे पुरावे लवकरच मी घराघरात पोहचविणार आहे, असे आव्हान राज्यमंत्री व महायुतीचे उमेदवार विजय शिवतारे आज दिले.

प्रसिध्दी पत्रकात शिवतारे पुढे म्हणाले; मागील पंचवार्षिकलाही ते स्वखर्चाने गुंजवणीचेढ पाणी आणणार होते. आता नव्याने परवाच स्वतःचे 1200 कोटी रुपये खर्चून पाणी आणायच्या वल्गना करणारे 1993 पासून कुठल्या बिळात लपले होते ? गुंजवणीचं पाणी आणण्यासाठी एक चिटोरी ज्याने कधी शासनाला लिहिली नाही, त्याने स्वतःच्या जलविद्युत केंद्रासाठी शेकडो पत्र सरकारला लिहिली. यावरूनच त्यांना शेतकऱ्यांची किती काळजी आहे ते दिसते.

सासवड येथील सभेत, मी गुंजवणीच्या पाण्यात अडथळा आणल्याचे सिद्ध केले तर सगळी संपत्ती दान करील; असे वक्तव्य संजय जगताप यांनी नुकतेच केले होते. राज्यमंत्री विजय शिवतारे यांनी या वक्तव्याची चिरफाड केली. स्वतःचे पैसे खर्च करायला आमदार व्हावे लागते का? त्यांनी खटले मागे घेतले असते तरी आत्तापर्यंत पाणी आले असते; असाही टोला शिवतारेंनी लगावला..

श्री. शिवतारे म्हणाले, सासवडला सुधारलेल्या रस्त्यांवर मरण पावलेल्या लोकांचा खोटा कळवळा ते आणतात. येथील दुभाजकाला मोजकेच ओपनिंग होते. जगताप यांनी स्वतःच्या पंपासाठी, कार्यकर्त्यांच्या दुकानांसाठी आणि व्यवसायांसाठी दादागिरी करून अनेक ठिकाणी ओपनिंग ठेवले. त्यालाच धडकून काही जीव गेले. त्यामुळे पेट्रोल पंपासाठी लोकांचे जीव घेणारांनी किती थापा माराव्यात?

विमानतळाला विरोध नाही. आताच्या जागेला आहे; या जगताप यांच्या वक्तव्याबाबत शिवतारे म्हणाले., विमानतळ बारामतीला न्यायचं षडयंत्र सुरु आहे. त्यासाठीच हा सगळा खटाटोप सुरु आहे. विमानतळ जाहीर होऊन 3 वर्ष झाली. सगळ्या परवानग्या झाल्या. हे आत्ता जागे झालेत. संजय जगताप यांच्यात हिंमत असेल तर त्यांनी कुठल्या गावात विमानतळ करणार हे जाहीर करावेच. तालुक्यात झालेल्या विकासाबाबत ते चकार शब्द बोलत नाहीत. फक्त टिका, शिवीगाळ, धमक्या देणाऱ्या भाषणांना लोक भिक घालणार नाहीत. राष्ट्रवादीच्या लोकांना संजय जगताप यांच्या इतका त्रास कुणीच दिला नसेल. मी कधीही सुडाचे राजकारण केले नाही आणि करणारही नाही. यांच्या सुडकथा मात्र लोकांनीच आठवाव्यात व निर्णय घ्यावा; असेही शिवतारे म्हणाले.

ज्यांना लुटलं त्यांनी सावध व्हावे...
विजय शिवतारे म्हणाले; गुंजवणीबाबतचे सगळे पुरावे मी सभेत मांडले. आता जनतेच्या न्यायालयात सादर करणार असून ज्यांना ज्यांना यांनी लुटलं त्यांना नामी संधी आलेली आहे. हा माणूस तसूभर जरी प्रामाणिक असेल तर यांनी दिलेला शब्द आता पाळावा. यांनी दान केलेली संपती ज्यांची लुटली त्यांना परत करावी.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com