vijay shivtare and bhide guruji | Sarkarnama

सांगलीत भाजप-सेना युतीसाठी भिडे गुरुजींनी प्रयत्न केले होते - विजय शिवतारे

सरकारनामा ब्युरो
गुरुवार, 26 जुलै 2018

सांगली : सांगली, मिरज, कुपवाड शहर महापालिकेच्या निवडणुकीत भाजप-शिवसेनेची युती व्हावी, यासाठी संभाजीराव भिडे-गुरुजी यांनी मध्यस्थी केली होती. परंतु, त्यात यश आले नाही, अशी माहिती शिवसेनेचे नेते, राज्यमंत्री विजय शिवतारे यांनी आज पत्रकार परिषदेत दिली. कॉंग्रेस-राष्ट्रवादीच्या भ्रष्ट कारभाराने वैतागलेल्या नागरिकांनी कौल दिला तर येथे भाजप-शिवसेना निकालानंतर एकत्र येऊन सत्ता स्थापन करू शकतात, त्याबाबत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे निर्णय घेतील, असेही त्यांनी स्पष्ट केले. 

ते म्हणाले, ""आज सकाळीच भिडे गुरुजींची भेट झाली. त्यांनी येथे भाजप-शिवसेना एकत्र यावी, यासाठी प्रयत्न केले होते. ते जमले नाही.'' शिवसेनेने येथे अगदी स्थानिक आघाडीसोबतही युती करायची नाही, अशी भूमिका घेतली होती, आज अचानक भूमिका कशी बदलली, या प्रश्‍नावर श्री. शिवतारे म्हणाले, ""सांगलीकरांचा जनादेश काय आहे, हे महत्वाचे आहे. ते कॉंग्रेस-राष्ट्रवादीच्या कारभाराला वैतागले आहेत. देशात, राज्यात, महापालिकेत सत्ता असताना गेली वीस वर्षे त्यांनी इथली वाट लावली. ज्या नदीचे पाणी पितात, त्याच ठिकाणी शहरातील नाला सोडला जातो, असे कदाचित हे एकमेव शहर असावे. तीन तीन हेवीवेट मंत्री असताना ही अवस्था. अशावेळी लोकांना पर्याय हवा आहे. शिवसेना सक्षम पर्याय आहेच, मात्र भविष्यात भाजपसोबत युती करण्याची गरज लागली तर उद्धव ठाकरे नक्कीच त्यावर निर्णय घेतील.'' 
 
अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख