vijay shivtare | Sarkarnama

विजय शिवतारेंना "कॅबिनेट'चे प्रमोशन ? 

उमेश बांबरे 
बुधवार, 26 एप्रिल 2017

शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी पाटणचे शंभूराज देसाई यांनी पक्षात प्रवेश करतानाच सहकार परिषदेचे अध्यक्षपद देऊन सन्मान केला होता. शंभूराज हे बाळासाहेब देसाईंचे नातू असल्याने पालकमंत्र्यांना प्रमोशन मिळाल्यानंतर त्यांच्या रिक्त होणाऱ्या राज्यमंत्र्यांच्या जागी संधी दिली जावी, अशी मागणी पुढे येऊ
शकते. 
 

सातारा : जलसंपदा राज्यमंत्री म्हणून चांगले काम केल्याबद्दल फेरबदलाच्या यादीत शिवसेनेकडून पालकमंत्री विजय शिवतारेंचे नाव आहे. त्यांना कॅबिनेट मंत्रिपदी प्रमोशन मिळण्याच्या चर्चेने वेग घेतला आहे. 

शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे परदेश दौऱ्यावर असल्याने ते परत आल्यावर मंत्र्यांच्या फेरबदलावर शिक्कामोर्तब होईल, असे समजते. पालकमंत्री म्हणून शिवतारेंची सुमार कामगिरी असली तरी राज्यमंत्री म्हणून चांगले काम केले आहे. याची दखल या फेरबदलात घेतली जाणार आहे.त्यामुळे शिवतारेंच्या प्रमोशनची चर्चा रंगली आहे. या शक्‍यतेला शिवतारेंनी दुजोरा दिला असला तरी त्यांच्यामते शिवसेनेत कोणतेही पद मागण्याचा अधिकारी कार्यकर्त्यांना नाही. तो शिवसेनेचे कार्याध्यक्ष उद्धव ठाकरेच ठरवितात. तरीही संधी मिळाल्यास आणखी चांगल्या प्रकारे काम करण्याचा प्रयत्न राहील, असे स्पष्ट केले आहे. 

 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख