शिवसेनेचे विजय नाहटा भाजपवासी गणेश नाईकांविरुद्ध बंडाच्या तयारीत ? 

भाजपसोबत शिवसेनेने केलेल्या तहात नाहटा बेलापूरची जागा हारल्याने नाहटा सध्यानाराज आहेत. नाहटांच्या नाराजीमुळे संतापलेल्या नाहटा समर्थक शिवसैनिकांनी राजीनामास्त्र ते रास्तारोको सारखे प्रकार केले आहेत.
Nahata-to-challenge-Naik.
Nahata-to-challenge-Naik.

नवी मुंबई  : शिवसेनेचे उपनेते आणि मुंबई झोपडपट्टी सुधारवस्ती महामडंळाचे सभापती विजय नाहटा यांच्यातर्फे भाजपच्या विरोधात बंडखोरी करण्याची शक्‍यता आहे. नाहटा यांना महायुतीकडून उमेदवारी नाकारल्यामुळे नाराज झालेले नाहटा अपक्ष निवडणूक लढवण्याच्या तयारीत आहेत. 


ऐरोली मतदार संघातून भाजपचे उमेदवार गणेश नाईकांविरोधात उमेदवारी लढवण्याची चर्चा दिवसभर समाजमाध्यमांवर रंगली होती.

बेलापूर मतदार संघावरून महायुतीचे वातावरण ताणले गेल्याने अखेरच्या क्षणी नाहटांच्या उमेदवारीवर पक्षाने पाणी फेरले. 

भाजपसोबत शिवसेनेने केलेल्या तहात नाहटा बेलापूरची जागा हारल्याने नाहटा सध्या  नाराज आहेत. नाहटांच्या नाराजीमुळे संतापलेल्या नाहटा समर्थक शिवसैनिकांनी राजीनामास्त्र ते रास्तारोको सारखे प्रकार केले आहेत. परंतू तरी देखील शिवसेनेकडून नाहटांना प्रतिसाद मिळत नाही.

 त्यामुळे नाहटांना गळाला लावण्यासाठी राष्ट्रवादीच्या बड्या नेत्यांपासून अगदी नवी मुंबईतील कॉंग्रेसच्या मंडळींनीही दंड थोपटले आहेत. परंतू नाहटांनी कोणालाही सकारात्मक प्रतिसाद दिला नाही. गुरूवारी दिवसभर नाहटांनी कार्यकर्त्यांसोबत बैठका घेतल्यानंतर ऐरोली मतदार संघातून अपक्ष उमेदवारी लढवण्याच्या बातम्या प्रसारमाध्यमांवर येत होत्या. 

ऐरोली मतदार संघात शिवसेनेच्या नगरसेवकांचे प्राबल्य नाईक समर्थक नगरसेवकांपेक्षा जास्त असल्याने भाजपतर्फे लढणाऱ्या नाईकांसमोर उभे राहण्याचा निर्णय नाहटांनी घेतला असावा असे समजते.

मात्र नाहटांच्या या भूमिकेबाबत त्यांना विचारले असता, अद्याप आपले काही निश्‍चित ठरले नसल्याचे त्यांनी सांगितले. परंतू शुक्रवार, 4 सप्टेंबर हा उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा अखेरचा दिवस असल्यामुळे नाहटांकडून शुक्रवारी अंतिम निर्णय घेण्याची दाट शक्‍यता आहे. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com