Manda-Mhate-Vijay
Manda-Mhate-Vijay

विजय मानेंचे बंड शमले, आता मंदा म्हात्रेंचा झेंडा घेणार खांद्यावर

ठाण्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे, नवी मुंबईचे विरोधीपक्षनेते विजय चौगुले यांनी माझी मनधरणी केल्याने मंदा म्हात्रेंना जाहीर पाठींबा देत आहे. -विजय माने

नवी मुंबई : बेलापूर विधानसभा मतदार संघाची जागा शिवसेनेच्या वाट्याला न आल्यामुळे महायुतीविरोधात बंडाचा झेंडा उगारणारे शिवसेनेचे शहरप्रमुख विजय माने यांची तलवार अखेर म्यान झाली आहे.

सोमवारी पत्रकार परिषदत घेत माने यांनी आपण यापूढे भाजप-शिवसेना महायुतीच्या उमेदवार आणि विद्यमान आमदार मंदा म्हात्रे यांचा प्रचार करणार असल्याचे स्पष्ट केले. माने यांची बंडखोरी मोडीत काढण्यात म्हात्रे यांना यश आल्यामुळे बेलापूर मतदार संघातील भाजप -  शिवसेनेतील रुसवे-फुगवे संपले आहेत.

महायुतीच्या जागा वाटपाचा फॉर्म्युला ठरवताना शिवसेनेने नवी मुंबईतील बेलापूर मतदार संघावर दावा केला होता. परंतू, बेलापूर मतदार संघात भाजपचा स्थानिक आमदार असल्यामुळे भाजपने हा मतदार संघ देण्यास नकार दिला. तर ऐरोली मतदार संघात भाजपवासी झालेल्या नाईक कुटुंबियांपैकी कोणीही एक जण उभा राहणार असल्याने ही जागाही शिवसेनेला मिळाली नाही. 

नवी मुंबईत शिवसेनेची ताकद असतानाही तिकीट न मिळाल्याने विजय माने यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज भरून पक्षाविरोधात बंडखोरी केली होती. मात्र वारंवार सांगूनही माने उमेदवारी मागे घेत नसल्यामुळे मानेंना हाकालपट्टी करण्याचा इशारा पक्षातर्फे देण्यात आला होता. तसेच ठाण्यातील नेत्यांनी मानेंची मनधरणी करीत उगीच कारवाई होईल याचे गांभीर्य मानेंना पटवून दिले होते. 


त्यामुळे अखेर माने यांनी वडार भवन येथे पत्रकार परिषद घेत मंदा म्हात्रे यांना पाठींबा जाहीर केला. या प्रसंगी उमेदवार मंदा म्हात्रे, शिवसेनेचे विरोधीपक्ष नेते व वडार समन्वय समितीचे अध्यक्ष विजय चौगुले आणि नगरसेवक उपस्थित होते.

माने यांनी म्हात्रे यांना पाठींबा जाहीर केल्यामुळे शिवसेनेच्या मतांचे विभाजन टळणार असल्याने म्हात्रेंच्या मताधिक्‍यात वाढ होणार आहे. परंतू जे शिवसेनेचे कार्यकर्ते म्हात्रे यांच्या विरोधात काम करणार आहेत त्यांच्यावर कठोर कारवाईचे संकेत शिवसेनेकडून मिळत आहेत.

पक्षाची ताकद असूनही आम्हाला उमेदवारी न दिल्याच्या नाराजीतून अपक्ष उमेदवारी अर्ज भरला होता. मात्र आता ठाण्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे, नवी मुंबईचे विरोधीपक्षनेते विजय चौगुले यांनी माझी मनधरणी केल्याने, तसेच पक्षाचे व माझ्या राजकीय कारकिर्दीचे नुकसान होऊ नये म्हणून मंदा म्हात्रेंना जाहीर पाठींबा देत आहे. यापूढे म्हात्रेंचा प्रचार करणार असे शिवसेनेचे शहर प्रमुख  विजय माने यांनी पत्रकारांना सांगितले. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com