कर्जबुडव्या मल्ल्याला स्कॉटलंड पोलिसांकडून अटक

कर्जबुडव्या मल्ल्याला  स्कॉटलंड पोलिसांकडून अटक

लंडन : भारतातील बॅंकांचे हजारो कोटी रुपये बुडवून परदेशात पळालेला मद्यसम्राट विजय मल्ल्याला लंडनमध्ये स्कॉटलंड पोलिसांनी अटक करण्यात आल्याचे वृत्त आहे. मल्ल्या हा फरार झाल्यापासून भारतात मोदी सरकारवर सातत्याने टीका होत होती. 
एका इंग्रजी वृत्तवाहिनीने हे वृत्त दिले असून अद्याप वृत्ताला अधिकृत दुजोरा मात्र मिळालेला नाही. मल्ल्याला लवकरच न्यायालयासमोर हजर केले जाईल असे सूत्रांनी सांगितले. 
भारतातील बॅंकांकडून हजारो कोटीचे कर्ज घेऊन तो फरारी झाला आहे. जवळजवळ नऊ हजार कोटी रुपयांचा त्याने बॅंकांना चुना लावला होता. मल्ल्या हा फरार झाल्यापासून लंडनमध्ये होता. काही दिवसांपूर्वीच त्याला दिल्लीतील विशेष न्यायालयाने अजामीनपात्र वॉरंट काढले होते. . परकीय चलन नियमन कायद्याचे उल्लंघन केल्याप्रकरणी हे वॉरंट काढण्यात आले होते. कर्जबुडव्या विजय मल्ल्याने मध्ये ब्रिटनमध्ये पळ काढला होता. मल्ल्याला पुन्हा भारतात आणण्यासाठी केंद्र सरकारचे प्रयत्न सुरू होते. भारताने ब्रिटिश सरकारकडे मल्ल्याला भारताकडे सोपवावे अशी विनंती केली होती. 
मंगळवारी स्कॉटलंड यार्ड पोलिसांनी आज सकाळी साडेनऊ वाजता अटक केल्याचे वृत्त आहे. लंडनमधील अटकेनंतर त्याला भारतात आणण्याची प्रक्रिया सुरू होऊ शकते. मल्ल्या हा राज्यसभेचा खासदारही आहे. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com