Vijay Gokhale takes charge of foreign secretary post | Sarkarnama

विजय  गोखले यांनी  परराष्ट्र  सचिव पदाचा कार्यभार  स्वीकारला

सरकारनामा ब्युरो
मंगळवार, 30 जानेवारी 2018

नवी दिल्ली :   विजय केशव गोखले यांनी   परराष्ट्र  सचिव पदाचा कार्यभार  स्वीकारला, हा बहुमान मिळविणारे ते  दुसरे पुणेकर  आहेत .  

नवी दिल्ली :   विजय केशव गोखले यांनी   परराष्ट्र  सचिव पदाचा कार्यभार  स्वीकारला, हा बहुमान मिळविणारे ते  दुसरे पुणेकर  आहेत .  

केंद्र शासनाच्या वतीने  १  जानेवारी  २०१८  रोजी  विजय गोखले यांचे नाव नवीन परराष्ट्र सचिव म्हणून जाहीर करण्यात आले होते. रविवार दिनांक २८ जानेवारी २०१८ रोजी  परराष्ट्र सचिव डॉ. एस. जयशंकर यांचा कार्यकाल संपला असून विजय गोखले यांनी  या पदाचा सोमवारी पदभार स्वीकारला.  पुढील  दोन वर्षांपर्यंत ते या पदावर राहणार आहेत.

श्री. गोखले हे भारतीय परराष्ट्र सेवेच्या (आय . एफ . एस . )१९८१ च्या तुकडीचे अधिकारी आहेत. त्यांनी चीनमध्ये भारताचे राजदूत म्हणून २०१६ -१७ मध्ये  काम केलेले आहे . ते चीन विषयक तज्ञ् मानले जातात .  चिनी भाषा आणि राजकारणाचा त्यांचा अभ्यास आहे .  चीन आणि भारत यांच्यात निर्माण झालेला डोकलाम वाद  सोडविण्यात विजय गोखले यांनी महत्त्वाची भूमिका पार पाडली होती.

 गोखले यांनी मलेशियात जानेवारी २०१० ते ऑक्टोबर २०१३ या कालावधीत भारताचे राजदूत म्हणून काम केले आहे. तर ऑक्टोबर २०१३ ते जानेवारी २०१६ या कालावधीत ते जर्मनीत भारताचे राजदूत होते.हाँगकाँग, चीन आणि अमेरिका येथेही  त्यांनी काम केले आहे. परराष्ट्र  सचिव पदाचा पदभार स्वीकारण्याआधी ते परराष्ट्र  मंत्रालयाच्या आर्थिक संबंधाचे सचिव म्हणून काम करीत होते.

यापूर्वी  पुण्याचे राम साठे यांनी १९७९ ते १९८२ या कालावधीत  परराष्ट्र सचिव पदाची जबाबदारी सांभाळली आहे. त्यांच्यानंतर एका महाराष्ट्रीय व पुणेकराला  दुसऱ्यांदा या पदावर काम करण्याचा  बहुमान मिळाला आहे.  

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख