भाजपचे माजी आमदार विजय घोडमारे यांनी हाती घेतले `घड्याळ' - vijay ghodmare joins NCP | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

मुंबईतील शेतकरी मोर्चा मेट्रो सिनेमाजवळ अडवला.... राजभवनवर जाण्यासाठी केवळ 20 जणांच्या शिष्टमंडळाला मंजूरी
मुंबईतील शेतकरी मोर्चा मेट्रो सिनेमाजवळ अडवला.... राजभवनवर जाण्यासाठी केवळ 20 जणांच्या शिष्टमंडळाला मंजूरी
सरपंचपदाचे आरक्षण नव्यानेच होणार आणि प्रशासकांच्या कारभाराची चौकशीही होणार

भाजपचे माजी आमदार विजय घोडमारे यांनी हाती घेतले `घड्याळ'

सरकारनामा ब्युरो
शनिवार, 14 सप्टेंबर 2019

राज्यभर कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते भाजपमध्ये जात असताना उपराजधानित मात्र विपरीत घडले. येथे जिल्ह्यातील हिंगणा विधानसभा मतदारसंघाचे भाजपचे माजी आमदार विजय घोडमारे यांनी आज पक्षाध्यक्ष शरद पवार यांच्या घरी जाऊन राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये प्रवेश केला. यावेळी त्यांच्यासोबत राष्ट्रवादी कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते व माजी मंत्री रमेश बंग होते.

नागपूर - राज्यभर कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते भाजपमध्ये जात असताना उपराजधानित मात्र विपरीत घडले. येथे जिल्ह्यातील हिंगणा विधानसभा मतदारसंघाचे भाजपचे माजी आमदार विजय घोडमारे यांनी आज पक्षाध्यक्ष शरद पवार यांच्या घरी जाऊन राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये प्रवेश केला. यावेळी त्यांच्यासोबत राष्ट्रवादी कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते व माजी मंत्री रमेश बंग होते.

2009 मध्ये निवडून आल्यानंतरही भाजपने 2014 च्या विधानसभा निवडणुकीत घोडमारेंना डावलले होते. हे करताना भाजपच्या ज्येष्ठ नेत्यांनी विधान परिषदेवर घेण्याचे आश्‍वासन दिले होते. पण ते पाळले नाही. यावेळीसुद्धा उमेदवारी मिळण्याचे कुठलेही संकेत दिसत नसल्याने घोडमारेंनी भाजपचा त्याग केला. आता ते राष्ट्रवादी कॉंग्रेसकडून हिंगणा विधानसभा मतदारसंघात लढल्यास विद्यमान आमदार समीर मेघे यांच्यासमोर मोठे आव्हान उभे करण्याची शक्‍यता वर्तविण्यात येत आहे. 

येत्या विधानसभा निवडणुकीत घोडमारे हिंगण्यातून लढणार की दुसऱ्या मतदारसंघातून हे मात्र स्पष्ट होऊ शकले नाही. यासाठी त्यांच्याशी संपर्क साधला असता ते उपलब्ध होऊ शकले नाही.

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख