वडार समाज विकास समितीच्या अध्यक्षपदी विजय चौगुले; राज्यमंत्रिपदाचा दर्जा

वडार समाज विकास समितीच्या अध्यक्षपदी विजय चौगुले; राज्यमंत्रिपदाचा दर्जा

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पंढरपूर येथील मेळाव्यात दिलेल्या आश्वासन अखेर पूर्ण केले.

नवी मुंबई : राज्यभरात विखुरलेल्या वडार समाजाला एकत्र करून त्यांचा विकास करण्यासाठी अखेर राज्य सरकारने वडार समाजासाठी आर्थिक विकास समितीची स्थापना केली आहे. शिवसेनेचे नवी मुंबई महापालिकेचे विरोधी पक्षनेते व राज्याच्या वडार समाजाचे नेते विजय चौगुले यांची समितीवर अध्यक्ष म्हणून नियुक्ती केली आहे.

विभक्त भटक्‍या जमाती व इतर मागासप्रवर्ग विभागातर्फे सरकारने 28 फेब्रुवारीला अद्यादेश जारी केला आहे. तीन प्रादेशिक व एक सहाय्यक उपायुक्तांमार्फत चौगुले या समितीचा कारभार चालवणार आहेत. 

गेल्या दोन महिन्यांपूर्वी सोलापूर येथे राज्यभरातील वडार समाजाला एकत्र करण्यासाठी विजय चौगुले यांच्या नेतृत्वाखाली भव्य सभेचे आयोजन केले होते. या मेळाव्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वडार समाजाच्या उन्नतीसाठी एका समितीची स्थापना करणार असल्याची घोषणा केली होती. त्यावर चौगुले यांची नियुक्ती करून त्यांना राज्यमंत्री दर्जाचे अध्यपद देणार असल्याची घोषणाही फडणवीस यांनी केली होती. फडणवीस यांच्या घोषणेमुळे शिवसेना व भाजपमध्ये सुरू असलेल्या राजकीय नाट्याला वेगळे वळण मिळाले होते. परंतू घोषणेला दोन महिने उलटल्यानंतर वडार आर्थिक विकास समितीची फडणवीस त्यांच्या शब्दाला जागले आहेत.

चौगुुले यांना राज्यमंत्र्यांचा दर्जा देऊन समाजकल्याण विभागाचे पुणे, नाशिक व औरंगाबाद येथील प्रादेशिक उपायुक्त व पुणे येथील समाजकल्याण विभागाचे सहाय्यक आयुक्त या अधिकाऱ्यांची नियुक्ती या समितीखाली करण्यात आली आहे. तसेच राहीलेल्या वर्षात वडार समाजाच्या उन्नतीसाठी शंभर कोटी रूपयांची तरतुद केली आहे.

सरकारच्या अद्यादेशानंतर चौगुले यांच्याकडून उद्या (ता.5) देवेंद्र फडणवीस आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेऊन कारभार स्विकारला जाणार आहे. तसेच पुणे किंवा नवी मुंबईतील कोकण भवन येथे कार्यालय थाटले जाणार आहे.

सरकारने दिलेल्या संधीचे सोने करणार असल्याचे चौगुुले यांनी सांगितले. सरकारी जमिनींवरील वडार समाजाने बांधलेली घरे त्यांच्या नावावर करणे, वडार समाजातील सुशिक्षीत तरूण बेरोजगारांना रोजगाराच्या संधी देणे, विधवा व निराधार महिलांना कौशल्य विकास कार्यक्रमातून स्वयंमरोजगार मिळवून देणे, समाजातील वृद्धांना पेन्शन योजना सुरू करणे, समाजाच्या तक्रारी व सूचना जाणून घेण्यासाठी तालुका व जिल्हा निहाय समित्या नेमणार, अशी माहिती विजय चौगुले यांनी दिली.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com