आजचा वाढदिवस ः आमदार विजय औटी (शिवसेना) पारनेर मतदारसंघ.  - vijay auti mla birthday | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

महाराष्ट्र एटीएसची मोठी कारवाई , 7 किलोग्राम यूरेनियमसह 2 जणांना अटक. दोन्ही आरोपी मागिल अनेक दिवसांपासून ग्राहकांच्या शोधात होते. जप्त केलेल्या युरेनियमची किंमत बाजारात २१ कोटी रुपये आहे.
गृह राज्यमंत्री शंभूराज देसाई यांच्या साताऱ्यातील घरासमोर अज्ञाताने शेणी पेटवल्या, त्यामुळे साताऱ्यात एकच खळबळ उडाली आहे. पोलिसांनी या पेटवलेल्या शेणी विझवून तेथून हटविल्या आहेत .

आजचा वाढदिवस ः आमदार विजय औटी (शिवसेना) पारनेर मतदारसंघ. 

सरकारनामा ब्युरो
मंगळवार, 27 फेब्रुवारी 2018

जन्म - 27 फेब्रुवारी 1957 

शिवसेनेचे आमदार विजय औटी हे पारनेर विधानसभा मतदारसंघातून सलग तीन वेळा निवडून आले आहेत. पारनेर तालुक्‍यातील जनतेचे प्रश्‍न मार्गी लावताना सर्वसामान्यांना पत मिळावी, यासाठी सेनापती बापट पतसंस्था स्थापन केली. विधिमंडळ अंदाज समितीचे सदस्य, रयत शिक्षण संस्थेचे जनरल बॉडी सदस्य, जिल्हा परिषद सदस्य अशी विविध पदे त्यांनी भूषविली. आमदार औटी यांचे वडील ज्येष्ठ कम्युनिस्ट नेते भास्करराव औटी पारनेर तालुक्‍याचे दहा वर्षे आमदार होते. त्यामुळे राजकारणाचे बाळकडू आमदार विजय औटी यांना लहानपणापासूनच मिळाले. 

विद्यार्थी दशेत असताना कॉंग्रेस पक्षाच्या युवक शाखेच्या जिल्हा सरचिटणीसपदी त्यांनी काम केले. 1986 मध्ये औटी यांनी ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्याबरोबर राहण्याचा निर्णय घेतला. पवार यांचे ते विश्‍वासू बनले. 1985 मध्ये औटी यांनी पारनेर विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढविली. मात्र त्यांना त्या वेळी अपयश आले. 2004 च्या विधानसभा निवडणुकीत त्यांना कॉंग्रेसने तिकीट नाकारले. त्यामुळे त्यांनी कॉंग्रेसला रामराम ठोकत शिवसेनेत प्रवेश केला आणि विजयश्री खेचून आणली. आपल्या वकृत्त्वशैलीने विधानभवनातील त्यांचे भाषणे गाजली. अधिवेशनाच्या काळात साखर कारखानदारीचे प्रश्‍न मांडून आपल्या अभ्यासूपणाची चुणूक दाखवून दिली. पुढे त्यांना पारनेरच्या जनतेने कधीच नाकारले नाही. सध्या शिवसेना स्टाईलने कामे करून घेण्याचा त्यांची हातोटी प्रसिद्ध आहे. 
 
अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख