विदुरा नवले यांच्याकडे पुन्हा तुकाराम कारखान्याची एकहाती सूत्रे

विदुरा नवले यांच्याकडे पुन्हा तुकाराम कारखान्याची एकहाती सूत्रे

पौड : संत तुकाराम सहकारी साखर कारखान्याच्या पंचवार्षिक निवडणूकीत मतदारांनी माजी खासदार, कारखान्याचे अध्यक्ष विदूरा नवले यांच्या नेतृत्वाखालील शेतकरी पॅनेलला पुन्हा एकहाती  दिली आहे. 

मुळशी तालुक्यातील हिंजवडी - ताथवडे गटात पांडूरंग राक्षे यांनी पॅनलला पाठींबा दिल्याने येथे औपचारिकता राहीली होती. या गटातील विदूरा नवले यांना  9974  मते मिळाली. तर बाळासाहेब बावकर 9421 आणि तुकाराम विनोदे 9090 मते मिळवून  विजयी झाले. या गटात 715 मते बाद झाली आहेत.

पौड - पिरंगुट गटाकडे सर्वांचे लक्ष वेधले होते. या गटातील दिलीप दगडे यांना  9401  मते मिळाली. तर अंकुश उभे 9438 आणि महादेव दुडे 8679 मते मिळवून विजयी झाले. संग्राम मोहोळ यांना मात्र 2337  मतांवर समाधान मानावे लागले. येथे 587 मते बाद झाली.

मावळ तालुक्यातील सोमाटणे - पवनानगर गटातून नरेंद्र ठाकर, सुभाष राक्षे, शामराव राक्षे हे बिनविरोध निवडून आले होते. मात्र सुरूवातीला रंगतदार वाटलेली तळेगाव - वडगाव गटातील निवडणूक मात्र एकतर्फीच झाली. या गटातील बापूसाहेब भेगडे (9192)   ज्ञानेश्वर दाभाडे (9131)   आणि शिवाजी पवार (9109)  हे पॅनलचे उमेदवार विजय झाले. तर त्यांच्या विरोधात मैदानात उतरलेल्या गेल्या पंचवार्षिकमध्ये नवले विरोधी पॅनलचे नेतृत्व केलेल्या बाऴासाहेब नेवाळे यांना अवघी 1415 मते पडली. तर पंढरीनाथ ढोरे (633), तुकाराम नाणेकर (824) यांच्यावरही पराभवाची नामुष्की ओढवली.

खेड-शिरूर- हवेली गटातही प्रविण काळजे, मधुकर भोंडवे, दिनेश मोहीते, अनिल लोखंडे या पॅनलच्या उमेदवारांच्या विरोधात अरूण लिंभोरे यांनी दिलेली एकाकी लढत सपशेल अपयशी ठरली. या गटात प्रविण काळजे (9687 ) मधुकर भोंडवे (9510 ), दिनेश मोहीते (9230 ), अनिल लोखंडे (9073 ) हे विजयी झाले. तर लिंभोरे यांनी फक्त 921  मते मिळाली. महिला प्रतिनिधींच्या दोन जागांसाठी झालेल्या लढतीत नवले पॅनलच्या ताराबाई सोनवणे (8773), शुभांगी गायकवाड (9782) या विजयी झाल्या. त्यांनी बंडखोर रूपाली दाभाडे (1475)यांचा पराभव केला. येथे 608 मते बाद झाली.

भटक्या विमुक्त जाती व जमातीच्या गटात नवले पॅनलचे बाळकृष्ण कोळेकर (9815) विजयी झाले. त्यांच्या विरूद्ध बंड पुकारलेले सुरेश जाधव यांना केवळ 225 मते पडली. पॅनलला पाठींबा दिलेले शिवाजी कोळेकर यांना 461 मते पडली. येथे 1036 मते बाद झाली. इतर मागासवर्ग प्रतिनिधीमध्ये पॅनलचे चेतन भुजबळ (9748 ) विजयी झाले असून त्यांच्या विरूद्धचे अरूण लिंभोरे यांना 1143    मते मिळाली. या गटात 713 मते बाद झाली. अनुसूचित जाती, जमाती गटात बाळू गायकवाड 9634 मतांनी विजयी झाले. त्यांनी सखाराम गायकवाड (972)यांनी पराभूत केले. येथे 705 मते बाद झाली.

निवडणूक निर्णय अधिकारी डॉ.आर.एस.धोंडकर यांच्या मार्गदर्शनाखाली अरूण साकोरे, श्रीकांत श्रीखंडे, शाहूराज हिरे, हर्षित तावरे, बी.एस.घुगे, दिग्विजय राठोड, संतोष शिरसेटवार यांनी मतमोजणी प्रक्रिया सुरळीत पार पाडली. त्यासाठी सुमारे दिडशे कर्मचारी पन्नास टेबलवर कार्यरत होते.

या निकालाबाबत बोलताना-विदुरा नवले म्हणाले की मुळशी, मावळ, खेड, शिरूर, हवेली तालुक्यातील शेतकऱ्यांना आर्थिक ताकद देण्यासाठी संत तुकारामची चोवीस वर्षापूर्वी निर्मीती झाली. सभासदांचा विश्वास आणि आतापर्यंतच्या संचालकांनी केलेले प्रामाणिक प्रयत्न यामुळे ऊस उत्पादनात हा कारखाना देशात पहीला आहे. या विजयातून मतदारांनी आमच्यावरील विश्वास सार्थ केला आहे. शेतकरी हित समोर ठेवूनच हा कारखाना भविष्यातही कार्यरत राहील.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com