विदर्भातील कार्यकर्ते अंदाज आराखडे बांधण्यात मश्‍गुल 

विदर्भातील कार्यकर्ते अंदाज आराखडे बांधण्यात मश्‍गुल 

विदर्भातील सात लोकसभा मतदारसंघांत मतदान झाल्यानंतर काल बव्हंशी उमेदवारांनी आराम करणे पसंद केले आणि आज पुढील कामांत व्यस्त झाले. त्यांचे कार्यकर्ते अंदाज आराखडे बांधण्यात मश्‍गुल झाल्याचे दिसत आहे.

नागपूर : विदर्भातील सात लोकसभा मतदारसंघांत मतदान झाल्यानंतर काल बव्हंशी उमेदवारांनी आराम करणे पसंद केले आणि आज पुढील कामांत व्यस्त झाले. त्यांचे कार्यकर्ते अंदाज आराखडे बांधण्यात मश्‍गुल झाल्याचे दिसत आहे. 

कार्यकर्त्यांचा काल आणि आजचा संपूर्ण दिवस आकडेमोड आणि दावे-प्रतिदावे करण्यात गेला. नागपुरातील दोन्ही प्रमुख उमेदवारांसाठी त्यांच्या-त्यांच्या राष्ट्रीय अध्यक्षांनी नागपुरात सभा घेतल्या. त्यामुळे उत्तरेपासून तर दक्षिणेपर्यंत झालेल्या मतदानाची टक्केवारी कुणाला कशी लाभदायक आणि घाट्याची राहील याचीच चर्चा होती.
 
भाजपचे हेवीवेट नेते केंद्रीयमंत्री नितीन गडकरी आणि माजी खासदार नाना पटोले यांच्यात प्रमुख लढत झाली. एकूण 30 उमेदवार रिंगणात होते. बसपचे मोहम्मद जमाल आणि वंचित आघाडीचे सागर डबरासे यांच्यामुळे निवडणुकीत रंगत आली. पटोले यांच्या प्रचारासाठी कॉंग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष राहुल गांधी तर नितीन गडकरी यांच्यासाठी भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी सभा घेतली. बसपच्या राष्ट्रीय अध्यक्ष मायावती यांच्या सभेलाही लक्षणीय गर्दी होती.

अपेक्षेपेक्षा मतदानाची टक्केवारी कमी झाल्याने काहींचा हिरमोड झाला तर काही उमेदवार आनंदात आहेत. याची गोळाबेरीज करण्याचे काम आजपर्यंत सुरू होते. 

दक्षिण नागपूर विधानसभा मतदारसंघात सर्वाधिक परस्पर विरोधी दावे केले जात होते. अनेकांनी आपला उमेदवार किती मतांनी निवडून येणार याची अचूक आकडेवारीसुद्धा काढून ठेवली. अनेकांनी गडकरी आणि पटोले यांच्या मताधिक्‍यांचे आकडेही व्हॉट्‌सऍपवर व्हायरल केले. 

उत्तरमधून कॉंग्रेसला मोठी आशा आहे. मात्र, येथील मतदानाची टक्केवारी फारशी वाढली नाही. वंचित बहुजन आघाडी आणि बसपच्या उमेदवाराला येथून मोठी आस आहे. विशेष म्हणजे दोन्ही उमेदवार उत्तरचेच रहिवासी आहेत. कॉंग्रेसचे नितीन राऊत आणि नगरसेवकांनी बजावलेली भूमिका येथे महत्त्वाची ठरणार आहे. 

मध्य नागपूर मुस्लिम व हलबांचा गड मानला जातो. निवडणुकीपूर्वी हलबांनी भाजपवर प्रचंड रोष व्यक्त केला होता. मात्र, निवडणूक जाहीर होताच त्यांच्यात फारशी आक्रमता दिसून आली नाही. येथे हलबा समाजाचे भाजपचेच आमदार आहेत. याशिवाय हलबा समाजाच्या नगरसेवकांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. यातील बव्हंशी भाजपचे आहेत. येथूनही वंचित व बसपच्या उमेदवाराला मोठी आशा आहे. 

पूर्वनंतर दक्षिण-पश्‍चिम मतदारसंघ सर्वाधिक आघाडी देईल अशी आशा भाजपला आहे. हा मतदारसंघ कुणबीबहुल आहे. सोबतच पश्‍चिम नागपूरमध्ये कुणबी समाजाची संख्या मोठी आहे. कॉंग्रेसचा डीएमके फॅक्‍टर येथे कितपत चालतो हे निवडणुकीच्या निकालानंतर स्पष्ट होणार आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com