नागभीड, धारणीमध्ये कमळ फुलले 

अमरावती जिल्ह्यातील धारणी पंचायत समिती व चंद्रपूर जिल्ह्यातील नागभीड नगरपंचायतीच्या निवडणुकांमध्ये यश संपादन करून भाजपने विदर्भातील यशाची कमान कायम ठेवली.
नागभीड, धारणीमध्ये कमळ फुलले 

नागपूर : अमरावती जिल्ह्यातील धारणी पंचायत समिती व चंद्रपूर जिल्ह्यातील नागभीड नगरपंचायतीच्या निवडणुकांमध्ये यश संपादन करून भाजपने विदर्भातील यशाची कमान कायम ठेवली. 

नागभीड नगरपंचायतीमध्ये नगराध्यक्षपदी भाजपाचे उमाजी हिरे निवडून आले. त्यांनी कॉंग्रेसचे नारायण रंदये यांचा पराभव केला. प्रभागांच्या निवडणुकीत मात्र भाजपला तेवढे यश मिळविता आले नाही. एकूण 17 सदस्यांच्या सभागृहात भाजपचे 9 तर कॉंग्रेसचे 7 सदस्य निवडून आले आहेत. एका अपक्ष सदस्यांनी विजय मिळविला आहे. 

आदिवासीबहुल असलेल्या व कुपोषणामुळे सातत्याने चर्चेत राहणाऱ्या धारणी पंचायत समितीच्या निवडणुकीत भाजपने भगवा फडकाविला आहे. या पंचायत समितीच्या 10 पैकी 10 जागांवर भाजपचे उमेदवार निवडून आल्याने धारणी पंचायत समिती कॉंग्रेस मुक्त झाली आहे. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com