vidharbha politics | Sarkarnama

विदर्भवाद्यांचे उद्या रेल रोको आंदोलन 

सरकारनामा ब्युरो
बुधवार, 5 एप्रिल 2017

सातत्याने विदर्भ आंदोलन अयशस्वी होत असताना विदर्भवाद्यांनी उद्या (ता. 6) रेल रोको आंदोलनाची हाळी दिली आहे. 

नागपूर : सातत्याने विदर्भ आंदोलन अयशस्वी होत असताना विदर्भवाद्यांनी उद्या (ता. 6) रेल रोको आंदोलनाची हाळी दिली आहे. 

राज्याचे माजी महाधिवक्ता श्रीहरी अणे यांनी आंदोलनात उडी घेतल्यानंतर या आंदोलनाला वेग व ठोस दिशा मिळेल, असे वाटत होते. परंतु ही अपेक्षाही फोल ठरली आहे. नगरपरिषद, महापालिका व जिल्हा परिषदांच्या निवडणुकांमध्येही विदर्भवाद्यांना फारसे यश मिळाले नाही. विदर्भ राज्य आंदोलन समितीने पुन्हा सेवाग्राम येथून आंदोलनाची तयारी केली आहे. 

आंदोलन समितीच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. या वेळी या आंदोलनाचे नेतृत्व राष्ट्रवादी कॉंग्रेसमधून आलेल्या राजकुमार नागुलवार यांच्याकडे देण्यात आले आहे. नागुलवार राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नागपूरचे नगरसेवक राहिले आहेत. त्यांच्या नेतृत्वात आता जुन्या जाणत्या नेते विदर्भासाठी आंदोलन करणार आहेत. 

या आंदोलनापासून श्रीहरी अणे मात्र दूर आहेत. अणे यांच्या नेतृत्वातील विदर्भ राज्य आघाडीचे कार्यकर्तेही या आंदोलनापासून दूर राहणार असल्याचे समजते. त्यामुळे सेवाग्राम येथे होणाऱ्या या आंदोलनाला कितपत यश मिळेल, हे उद्याच कळणार आहे. 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख