विदर्भातील `हे' नेते मतदानानंतर काय करताहेत? 

मतदान झाल्यानंतर विदर्भातील प्रमुख उमेदवारांनी काल आणि आज काय केले आणि निकाल लागेपर्यंत ते काय करणार आहेत हे `सरकारनामा'ने जाणून घेतले.
विदर्भातील `हे' नेते मतदानानंतर काय करताहेत? 

नागूपर - विदर्भातील सात लोकसभा मतदारसंघांमध्ये मतदानाची प्रक्रिया काल पार पडली. मतदानाच्या दिवसापर्यंत सर्व उमेदवार प्रचंड व्यस्त होते. बव्हंशी उमेदवार सकाळी लवकरच प्रचारासाठी घराबाहेर पडून रात्री उशिरापर्यंत मतदार संघात फिरस्तीवर राहात होते. सततच्या बैठका, रॅली, प्रचार सभा यांनंतर अखेरीस काल मतदान पार पडले. निकाल 23 मे रोजी लागणार आहेत. मतदान झाल्यानंतर प्रमुख उमेदवारांनी काल आणि आज काय केले आणि निकाल लागेपर्यंत ते काय करणार आहेत हे `सरकारनामा'ने जाणून घेतले. 

नितीन गडकरी
नितीन गडकरी रामनवमी सोहळा आटोपून केरळ, तामीळनाडूला निघणार नागपूर लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार नितीन गडकरींनी आज दिवसभर आराम केला. उद्या रामनवमीचा सोहळा आटोपून ते रामटेकला गडमंदीरावर जाऊन प्रभू श्रीरामांचे दर्शन घेणार आहेत. तेथे एका कौटुंबिक सोहळ्यात ते सहभागी होतील. त्यानंतर रविवारी ते पक्षाच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ केरळ आणि तामीळनाडू राज्याच्या दौऱ्यावर निघणार आहेत. 

नाना पटोले
नागपुरचे उमेदवार नाना पटोलेंच्या घरी भेटायला येणारे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि लोकांची रीघ काल मतदान संपल्यानंतर लागली होती. रात्री उशीरापर्यंत त्यांनी लोकांच्या भेटी घेतल्या. आज सकाळी ते कुटुंबातील एका लग्नाला गेले होते. उद्या रामाचं दर्शन घेऊन ते बिहार आणि उत्तर प्रदेशमधील पक्षाच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी निघणार आहेत. महाराष्ट्रातीलही काही मतदारसंघांमध्ये त्यांचे प्रचार दौरे होणार आहेत. 

माणिकराव ठाकरे
माणिकराव ठाकरे गेला महिनाभर सकाळी सातला प्रचारासाठी बाहेर पडत व रात्री 2 ला परत येत. 62 वर्षे वय असलेल्या माणीकरावांची शरीरयष्टी दणकट आहे. थकवा कधी त्यांच्या चेहऱ्यावर दिसत नाही. महीनाभराच्या प्रचारानंतर आज दुपारी त्यांनी थोडा वेळ आराम केला. उद्या ते अकोल्याला जाणार आहेत. त्यानंतर ते भिवंडी, औरंगाबाद, पुणे व सोलापूर येथे प्रचारासाठी दौऱ्यावर निघणार आहेत 17 एप्रिलपर्यंत ते पक्षाच्या उमेदवारांचा प्रचार करणार आहेत. 
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com