कॉंग्रेसच्या पहिल्या यादीत विदर्भाच्या `यंग ब्रिगेड'मधील 13 उमेदवार

विधानसभा निवडणुकीसाठी कॉंग्रेसने आपली 51 उमेदवारांची पहिली यादी घोषित केली असून यातील बहुतांश उमेदवार पक्षातील "यंग ब्रिगेड'चे सदस्य आहेत. गत अनुभवावरुन कॉंग्रेस या निवडणुकीत तरुणांना अधिकाधिक वाव देईल, असे या यादीवरून दिसून येत आहे.
कॉंग्रेसच्या पहिल्या यादीत विदर्भाच्या `यंग ब्रिगेड'मधील 13 उमेदवार

नागपूर - विधानसभा निवडणुकीसाठी कॉंग्रेसने आपली 51 उमेदवारांची पहिली यादी घोषित केली असून यातील बहुतांश उमेदवार पक्षातील "यंग ब्रिगेड'चे सदस्य आहेत. गत अनुभवावरुन कॉंग्रेस या निवडणुकीत तरुणांना अधिकाधिक वाव देईल, असे या यादीवरून दिसून येत आहे. 

या यादीत विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार, पक्षाचे प्रदेश कार्याध्यक्ष डॉ. नितीन राऊत व विदर्भातील एकमेव खासदार बाळू धानोरकर यांच्या पत्नी प्रतिभा धानोरकर यांच्यासह विदर्भातील 13 जणांचा समावेश आहे.

पक्षाच्या केंद्रीय निवडणूक समितीचे प्रभारी व महासचिव मुकुल वासनिक यांनी जाहीर केलेल्या यादीत खासदार बाळू धानोरकर यांच्या पत्नी प्रतिभा धानोरकर यांना वरोरा (चंद्रपूर जिल्हा) मतदारसंघातून पक्षाची उमेदवारी मिळाली आहे. आठ विद्यमान आमदारांवरही पक्षाने पुन्हा विश्‍वास दाखवून त्यांना परत उमेदवारी दिली आहे. त्यात विधानसभेतील विरोधी पक्ष नेते विजय वडेट्टीवार (ब्रह्मपुरी) यांचाही समावेश आहे. 

उमेदवारी मिळवणारे अन्य आमदार हर्षवर्धन सपकाळ (बुलडाणा), अमित झनक (रिसोड), वीरेंद्र जगताप (धामणगाव रेल्वे), यशोमती ठाकूर (तिवसा), अमर काळे (आर्वी), रणजित कांबळे (देवळी) व सुनील केदार (सावनेर) हे आहेत. घोषित झालेल्या विदर्भातील अन्य उमेदवारांमध्ये ऍड्‌. अनंत वानखेडे (मेहकर), डॉ. नितीन राऊत (उत्तर नागपूर), सतीश वारजूकर (चिमूर) व बाळासाहेब मांगूळकर (यवतमाळ) यांचा समावेश आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com