विदर्भातील कॉंग्रेसच्या `या' आमदारांचा होणार मंत्रिमंडळात समावेश

महाराष्ट्रात महाआघाडीची सत्ता स्थापन होत आहे. शिवसेना नेते उद्धव ठाकरे उद्या शिवतीर्थावर मुख्यमंत्रिपदाची शपथ घेणार आहेत. ठाकरेंच्या मंत्रिमंडळात विदर्भातील कॉंग्रेसच्या चार आमदारांचा समावेश होणार असल्याची माहीती आहे. यांपैकी दोन आमदार उद्या शिवतीर्थावर तर उवरीत मंत्र्यांचा शपथविधी 1 डिसेबरला होणार असल्याची माहिती आहे.
विदर्भातील कॉंग्रेसच्या `या' आमदारांचा होणार मंत्रिमंडळात समावेश

नागपूर - महाराष्ट्रात महाआघाडीची सत्ता स्थापन होत आहे. शिवसेना नेते उद्धव ठाकरे उद्या शिवतीर्थावर मुख्यमंत्रिपदाची शपथ घेणार आहेत. ठाकरेंच्या मंत्रिमंडळात विदर्भातील कॉंग्रेसच्या चार आमदारांचा समावेश होणार असल्याची माहीती आहे. यांपैकी दोन आमदार उद्या शिवतीर्थावर तर उवरीत मंत्र्यांचा शपथविधी 1 डिसेबरला होणार असल्याची माहिती आहे.

स्थापन होणाऱ्या मंत्रीमंडळात विदर्भातील अमरावती जिल्ह्यातील तिवसाच्या आमदार यशोमती ठाकूर, भंडारा जिल्ह्यातील साकोलीचे आमदार नाना पटोले, उत्तर नागपुरचे आमदार डॉ. नितीन राऊत आणि नागपूर जिल्ह्यातील सावनेरचे आमदार सुनील केदार यांचा समावेश असल्याची माहीती सुत्रांनी दिली.

माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाजनादेश यात्रेची सुरुवात तिवसा मतदारसंघातील गुरुकुंज मोझरी येथून केली होती. या मतदारसंघात महायुतीचा उमेदवार तगडी टक्कर देणार असे चित्र निर्माण करण्यात आले होते. त्या परीस्थितीतही यशोमती ठाकूर यांनी आपली विजयाची परंपरा कायम ठेवली. 

भाजपच्या खासदारकीचा राजीनामा देऊन कॉंग्रेसमध्ये दाखल झालेल्या नाना पटोलेंनी नागपुर लोकसभा मतदारसंघात भाजपटे हेवीवेट नेते नितीन गडकरी यांच्या विरोधात निवडणूक लढवीली होती. येथे पराभूत झाल्यानंतर त्यांनी साकोली विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी दाखल केली. तेथे त्यांना पराभूत करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींची सभा घेण्यात आली तरीही नाना पटोलेंनी विजय मिळविला. 

डॉ. नितीन राऊत 2009 ते 2014 या कालावधीत आघाडीच्या सरकारमध्ये मंत्री होते. तर सुनील केदार पाचव्यांदा निवडून आले आहेत. विदर्भातील या चार आमदारांचा समावेश मंत्रीमंडळात होणार असल्याची माहीती आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com