vidhansabha preparation : who will be ncp`s candidate from hadapsar? | Sarkarnama

तयारी विधानसभेची : हडपसरमध्ये राष्ट्रवादीकडून रोहित नसतील तर तुपे किंवा ससाणे? 

उमेश घोंगडे
गुरुवार, 16 मे 2019

पुणे : कॉंग्रेस-राष्ट्रवादीच्या आघाडीत हडपसर विधानसभा मतदारसंघ राष्ट्रवादीच्या वाट्याला येण्याची शक्‍यता आहे. मतदासरसंघ राष्ट्रवादीकडे आली तरी पक्षाकडून शहराध्यक्ष चेतन तुपे यांना उमेदवारी मिळणार की नगरसेवक योगेश ससाणे यांना संधी मिळणार याबाबत उत्सुकता निर्माण झाली आहे.

जिल्हा परिषदेचे सदस्य रोहित पवार हे देखील हडपसरमधून निवडणूक लढविण्यासाठी अंदाज घेत आहेत. त्यांनी सध्या नगर जिल्ह्यातील कर्जत-जामखेड या मतदारसंघात लक्ष केंद्रीत केले आहे. त्यामुळे ते हडपसरमधून नसतील तर राष्ट्रवादीच्या स्थानिक नेत्यांना येथे रिंगणात उतरविण्यात येईल.

या मतदारसंघात योगेश टिळेकर हे भातीय जनता पार्टीचे आमदार असले तरी तुलनेत राष्ट्रवादीची ताकद मोठी आहे. त्यामुळे राष्ट्रवादीची उमेदवारी मिळाली तुपे किंवा ससाणे जोरदार लढत देऊ शकतात. 

भाजपा-शिवसेनेच्या युतीच्या जागावाटपात हा मतदारसंघ मिळविण्यात शिवसेना आग्रही राहण्याची शक्‍यता आहे. माजी आमदार महादेव बाबर व नगरसेवक प्रमोद भानगिरे हे दोन शिवसेनेकडून प्रमुख दावेदार आहेत. भाजपाकडून विद्यमान आमदार योगेश टिळेकर इच्छुक आहेत. कॉंग्रेसकडून माजी मंत्री बाळासाहेब शिरवकर पुन्हा तयारी करू शकतात. महापालिकेतील सत्तेचे गणित पाहिले तर मतदारसंघात भाजपाचे आठ नगरसेवक निवडून आले आहेत. राष्ट्रवादीची मोठी ताकद आहे. राष्ट्रवादीचे तब्बल 11 नगरसेवक आहेत. 

राष्ट्रवादीकडून शहराध्यक्ष तुपे हे प्रबळ दावेदार आहेत. गेल्यावेळी त्यांनी या मतदारसंघातून टिळेकर यांना लढत दिली आहे. दरम्यान, तुपे यांच्याकडे शहराध्यक्षपदाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. पक्षाचा तरूण, अश्‍वासक चेहरा म्हणून त्यांच्याकडे पाहिले जाते. महापालिकेत विरोधी पक्षनेते म्हणूनदेखील त्यांची कामगिरी दमदार ठरली आहे. ते विधानसभेवरील आपला हक्क सहजासहजी सोडणार नाहीत.

पक्षातले आणखी एक इच्छुक नगरसेवक योगेश ससाणे यांनी पाच वर्षापासून आमदारीकीची तयारी चालविली आहे. अडीच वर्षापूर्वी झालेल्या महापालिका निवडणुकीत ससाणे मोठ्या मताधिक्‍क्‍याने निवडून आले आहेत. हडपसर परिसरात त्यांचा चांगला संपर्क आहे. 

या संदर्भात बोलताना ससाणे यांनी हडपसरमधून राष्ट्रवादीचा आमदार निश्‍चितपणे निवडून आणण्याचा निर्धार व्यक्त केला. मी स्वत:, चेतन तुपे किंवा आमच्या दोघांशिवाय इतर कुणालाही पक्षाने उमेदवारी दिली तरी आम्ही सर्वजण एकदिलाने काम करणार आहे. काहीही झाले तरी यावेळचा हडपसरचा आमदार राष्ट्रवादीचाच असेल, असा त्यांनी केला.

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख