विधानसभा महाराष्ट्राची की इंग्रजांची : फडणविसांचा सवाल

...
विधानसभा महाराष्ट्राची की इंग्रजांची : फडणविसांचा सवाल

नागपूर : विधानसभेत वीर सावरकरांच्याच्या मुद्द्यावर बोलत असताना अध्यक्षांनी फडणवीसांचे बोलणे रेकॉर्डवरून काढून टाका, अशा सूचना देताच ही विधानसभा महाराष्ट्राची की इंग्रजांची, असा घणाघाती आरोप त्यांनी केला.

अध्यक्षांच्या या भूमिकेविरोधात सर्वच विरोधी आमदारांनी "वेल'मध्ये येत घोषणाबाजी करण्यास सुरुवात केली.
सरन्यायाधीश शरद बोबडे यांच्या अभिनंदन प्रस्तावावर बोलताना विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी सरन्यायाधीश शरद बोबडे यांच्या कुटुंबाद्वारे आजही राबविण्यात येणाऱ्या सामाजिक कामाचा दाखला दिला.

वीर सावरकर हे अनेकदा बोबडे यांच्या घरी आले असल्याचे ते म्हणाले. त्यामुळे स्वातंत्र्य चळवळ आणि सामाजिक कार्यात अग्रेसर असलेल्या बोबडे कुटुंबीयांच्या कार्यावरही शंका घेणार काय? असा सवाल त्यांनी उपस्थित केला. यानंतर कामकाज सुरू होताच त्यांनी या मुद्द्यावर चर्चेची परवानगी मागितली. अध्यक्षांनी चर्चेला नकार देत त्यांचे म्हणणे रेकॉर्डवर न घेण्यास सांगितले. त्यामुळे देवेंद्र फडणवीस यांनी ही विधानसभा महाराष्ट्राची की इंग्रजांची, असे म्हणत तीव्र संताप व्यक्त केला. भाजपचे आमदार "मी सावरकर' अशी भगवी टोपी घालून सभागृहात आले होते.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com