मुंबई (Mumbai): पनवेल येथील भाजपच्या बैठकीत भाजपचे नेते, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (devendra fadnavis) यांनी काल (शनिवारी) शिवसेनचे नेते, खासदार संजय राऊत यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला. त्याला राऊतांनी आज प्रत्युत्तर दिले. ते माध्यमांशी बोलत होते. ते म्हणाले, "आमचा आवाज बुलंद आहे, तो घुमत राहणार. शिवसेनेच्या गर्जनेपुढे तुमचा टीकाव लागणार नाही, शिवसेनेचा लाऊडस्पीकर तुम्हाला बधीर केल्याशिवाय राहणार नाही, चोऱ्यामाऱ्या करुन हे सरकार आले आहे. हे सरकार फार काळ टीकणार नाही. हे सरकार मजबूत पायावर उभे नाही, आमचा लाऊडस्पीकर ५६ वर्षांपासून सुरु आहे, आमचा लाऊडस्पीकर हा महाराष्ट्राच्या जनतेचा बुलंद आवाज आहे आणि तो तसाच घुमत राहील"
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.