Video: पंजाबचा विजयोत्सव अलिबागमध्ये पेढे वाटून साजरा

पाच राज्याच्या आजच्या मतमोजणीत पंजाबच्या(Punjab) जनतेने अरविंद केजरीवाल (Arvind Kejriwal)यांच्या आप पक्षाला स्पष्ट मतदारांनी कौल दिला आहे. आपच्या(AAP) झाडूने काँग्रेस आणि भाजपला सत्तेपासून दूर ठेवले आहे. पंजब मधील आपच्या या विजयाने अलिबाग मधील कार्यकर्त्यांनी पेढे वाटून विजयोत्सव साजरा केला. अलिबाग शहरातील एस टी स्थानक परिसरात आपच्या कार्यकर्त्यांनी नागरिकांना पेढे वाटले. यावेळी पंजाबच्या मतदाराचे आपच्या पदाधिकारी यांनी आभार व्यक्त केले. आपचे जिल्हाध्यक्ष मनोज घरत, ऍड अजय उपाध्ये, पिके सुनीलकुमार, श्रीकांत शिंदे, संदीप घाडी, दिलीप जोग यावेळी या विजयोत्सवात सहभागी झाले होते. गोव्यात ही आपने खाते खोलले असून दोन उमेदवार विजयी झाले आहेत. पंजाबमध्ये आप पक्षाला स्पष्ट बहुमत मिळाले आहे. आपचे 90 उमेदवार विजयी झाले आहेत. सत्ताधारी पक्ष असलेल्या काँग्रेस पक्षाला 18 तर भाजपला 2 जागांवर समाधान मानावे लागले आहे. अरविंद केजरीवाल हे खरे हिरो आजच्या निकालानंतर ठरले आहेत. गोवा राज्यातही आपने दोन उमेदवार जिंकून मुसंडी मारली आहे. आपच्या माध्यमातून दिल्लीच्या धर्तीवर विकास पंजाबमध्ये होणार असल्याचे या निकालानंतर स्पष्ट होत आहे. मतदारांनी काँग्रेस आणि भाजपला नाकारून आपला पसंती दिल्याने आपसाठी हा मोठा विजय मानला जात आहे. महाराष्ट्रातही बदल घडविण्यासाठी मतदारांनी आम्हाला साथ द्या असे मत दिलीप जोग यांनी व्यक्त केले आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com