निवडणूक आयोग कुणाच्या इशाऱ्यावर चालतो?;पाहा व्हिडिओ

नागपूर (Nagpur) - निवडणूक आयोग (Election Commission) कुणाच्या इशाऱ्यावर चालतो, हे आता देशातील जनतेला माहिती पडले आहे. राज्यात नगरपंचायत आणि भंडारा, गोंदिया जिल्हा परिषदेच्या निवडणुका लागल्या असताना ओबीसी आरक्षणाचा (OBC Reservation) प्रश्‍न सुटल्याशिवाय या निवडणुका घेऊ नये, त्या पुढे ढकलाव्या, असा निर्णय राज्याच्या कॅबिनेटमध्ये घेऊन त्याचा अहवाल निवडणूक आयोगाला पाठविला होता. तरीही आयोगाने निवडणुका (Election Commission) लादल्याच. त्यामुळे आज कोरोनाच्या तिसऱ्या लाटेमध्ये निवडणुका (Election) घ्याव्या की पुढे ढकलाव्या, यावर चर्चा करणे व्यर्थ ठरेल, असे कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आज येथे म्हणाले. (व्हिडिओ ः अतुल मेहेरे)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in