प्रदेशाध्यक्ष मा. जयंत पाटीलांची त्यांच्या साखराळे या गावाला भेट,पाहा व्हिडिओ

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे (NCP)राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय खासदार शरद पवार(Sharad Pawar)यांच्या वाढदिवशी पक्षाचे प्रदेशाध्यक्ष तथा जलसंपदा मंत्री ना. जयंत पाटील(Jayant Patil) यांनी 'एक तास राष्ट्रवादीसाठी - आगामी महाराष्ट्राच्या विकासासाठी - प्रभावी, प्रगल्भ, तरुण, पुरोगामी विचारांसाठी' या उपक्रमाची संकल्पना मांडली होती. प्रदेशाध्यक्ष मा. जयंत पाटील यांनी आज त्यांच्या साखराळे या गावाला भेट देत वर्षाच्या पहिल्या दिवशी या उपक्रमाची सुरूवात केली आहे. महाराष्ट्रात एकही असा तालुका नाही जिथे पवार साहेबांच्या विचारांना मानणारा वर्ग नाही. माणसाने आयुष्यात काय कमावले पाहिजे तर ती माणसं, हे पवार साहेबांनी त्यांच्या पाठीशी उभे राहिलेल्या माणसांच्या धनामुळे सिद्ध केले आहे. पवार साहेबांच्या विचारांची वैचारिक शिदोरी आपल्याकडे आहे ती शिदोरी महाराष्ट्रातील तळागाळातील कार्यकर्त्यांच्यापर्यंत पोहोचली पाहिजे, या विचारधारेने प्रत्येक कार्यकर्ता प्रेरीत झाला पाहिजे. हा विचार तळागाळापर्यंत पोहोचवण्यासाठी 'एक तास राष्ट्रवादीसाठी - आगामी महाराष्ट्राच्या विकासासाठी - प्रभावी, प्रगल्भ, तरुण, पुरोगामी विचारांसाठी' हा उपक्रम आम्ही हाती घेतला आहे, अशी या उपक्रमामागील संकल्पना मा. जयंत पाटील यांनी विषद केली

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com