'विद्यार्थ्यांच्या 50 टक्के उपस्थितीवर शाळा सुरू ठेवा';पाहा व्हिडिओ

विद्यार्थ्यांच्या 50 टक्के उपस्थितीवर शाळा सुरू ठेवा अशी मागणी शिवसेनेचे माजी राज्यमंत्री अर्जुन खोतकर (Arjun Khotkar) यांच्यासह इंडिपेंडेट इंग्लिश स्कूल असोसिएशनने आज आरोग्यमंत्री राजेश टोपे (Rajesh Tope) यांच्याकडे केली. या मागणीवर मुख्यमंत्री निर्णय घेतील, असे आश्वासन राजेश टोपे (Rajesh Tope) यांनी संघटनेला दिले. राज्यातील विना स्वयं अर्थसहाय्यीत शाळांमध्ये 10 लाख शिक्षक आणि 2 लाख कर्मचारी कार्यरत असून शाळा बंद झाल्यामुळे 12 लाख जणांवर उपासमारीची वेळ आल्याचे या वेळी आरोग्यमंत्र्याना सांगण्यात आले. (Demand of school associations to the Health Minister) हे निवेदन देण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात आलेल्या शिक्षकांनी या नियमांचा फज्जा उडवत जमावबंदी आदेशाच उल्लंघन केले. त्यामुळे जिल्हाधिकारी कार्यालयातच नियमांचा फज्जा उडाला.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com