Video : बैल एकटा येत नाही, जोडीनं येतो अन् तोही नांगरासकट : देवेंद्र फडणवीस

पिंपरी-चिंचवड (Pimpri chinchwad): टाळगाव चिखली येथील बैलगाडा शर्यतीच्या ठिकाणी विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) कुर्ता-जॅकेट व पायजमामध्ये दिसले. याबाबत मिश्कीलपणे ते म्हणाले, ‘‘आमदार महेश लांडगे (MLA Mahesh Landge) यांनी खास बैलगाडा शर्यतीसाठी (bailgada sharyat)मला कपडे शिवून दिली व परिधान करायला लावली. शर्यतीत बैलांना झूल घालत नाहीत, कारण त्याला पळायचे असते. मात्र, मुख्य अतिथींना झूल घालून मिरवायला महेश लांडगे यांनी लावले’’. तसेच ‘‘मुळशी पॅटर्नच्या डायलॉगप्रमाणे बैल कधी एकटा येत नाही, जोडीनं येतो आणि तोही नांगरासकट. हा नांगर कुणासाठी, तर बैलगाडा शर्यतीला विरोध करणाऱ्यांसाठी आहे, असा इशाराही फडणवीस यांनी दिला.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com