आमदार अतुल सावे यांच्या कार्यालयावर हल्ला

औरंगाबाद: डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात शनिवारी (ता.11) पंडित दीनदयाळ उपाध्याय यांच्या जयंती निमित्त आयोजित करण्यात आलेल्या व्याख्यानाला पॅंथर सेनेने विरोध दर्शवला होता. यावरून अभाविप, भाजयुमो आणि पॅंथर सेनेत विद्यापीठात राडा झाला होता. आमदार अतुल सावे हे आंबेडकरवादी विद्यार्थ्यांवर हल्ला करणाऱ्या भाजयुमोच्या कार्यकर्त्यांना पाठीशी घालत असल्याचा आरोप करत पॅंथर सेनेच्या कार्यकर्त्यांनी गुरुवारी दुपारी अतुल सावे यांच्या बजरंग चौक येथील संपर्क कार्यालयावर दगडफेक केली. या घटनेमुळे काहीकाळ तणाव निर्माण झाला होता. 

कुलगुरू बी.ए. चोपडे हे विद्यापीठात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे विचार रुजवत असून भाजप व भाजयुमोच्या कार्यकर्त्यांना पाठीशी घालत असल्याचा आरोप देखील पॅंथर सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी केला. भाजयुमोच्या कार्यकर्त्यांनी शनिवारी विद्यापीठात येऊन गोंधळ घालत दरवाजावर लाथा मारल्या, तसेच आंबेडकरवादी विद्यार्थ्यांना मारहाण केली. मात्र हल्लेखोरांवर कारवाई करण्याऐवजी आमदार अतुल सावे आणि कुलगुरूंनी त्यांना पाठीशी घातले असा आरोप पॅंथर सेनेने निवेदनाद्वारे केला आहे. या घटनेवरून सुरू असलेल्या धुसफूसीचे पर्यावसन आज अतुल सावे यांच्या कार्यालयावरील दगडफेकीत झाले. पाच ते सहा कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी करत सावे यांच्या कार्यालयावर दगडफेक केली. यात कार्यालयाच्या खिडकीच्या काचा फुटल्या. दगडफेक झाली तेव्हा सावे कार्यालयात नव्हते. हा प्रकार समजताच भाजपचे कार्यकर्ते व आमदार अतुल सावे घटनास्थळी दाखल झाले. या प्रकरणी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com