खासदार गायकवाडांची गोची

लातूर-मुंबई-लातूर रेल्वेचा कर्नाटकातील बिदरपर्यंत विस्तार केल्याने लातूरकर प्रचंड संतापले आहेत. कर्नाटकने हक्काची रेल्वे पळवल्याचा आरोप करत लोक रस्त्यावर उतरून आंदोलन करत आहेत. लातूरच्या जनतेत या निर्णयामुळे रोष आहे, तर तिकडे उदगीरकरांची सोय झाल्यामुळे त्यांनी जल्लोष साजरा केला. आता नेमकी लातूरकरांची बाजू घ्यावी की उदगीरकरांची या कात्रीत खासदार डॉ. सुनील गायकवाड हे सापडले आहेत. उदगीरच्या बाजूने बोलावे तर लातूरचे लोक नाराज होतात, लातूरकरांचे समर्थन करावे तर उदगीरकर नाराज होतात. लातूर-मुंबई रेल्वे बिदरपर्यंत नेल्यामुळे खासदार गायकवाडांच्या विरोधात लातूरमध्ये नाराजीचा सूर उमटत आहे. यावर गायकवाड यांनी सोशल मिडियावर एक व्हिडिओ व्हायरल करत मी लातूरकरांच्या सोबत असल्याचे म्हटले आहे. त्यामुळे आता उदगीरचे मतदार खप्पा झाल्याची चर्चा आहे. कुणा एकाची बाजू घेता येत नसल्याने खासदार गायकवाडांची पुरती गोची झाल्याचे दिसून आले आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com