मुख्यमंत्री फडणवीस दुसरे बाजीराव पेशवे : नाना पटोले यांचे टीकास्त्र

राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व दुसरे बाजीराव पेशवे यांचे कृत्य सारखेच आहे. त्यामुळे मुख्यमंत्री फडणवीस दूसरे बाजीराव पेशवे असल्याची टीका अखिल भारतीय कॉंग्रेस किसान सेलचे अध्यक्ष तथा महाराष्ट्र प्रदेश कॉंग्रेसचे प्रचार प्रमुख नाना पटोले यांनी शनिवारी पत्रकार परिषदेत केली आहे. फडणवीस यांच्या सारखा खोटारडा मुख्यमंत्री पहिल्यांदाच बघितल्याचे सुद्धा पटोले यावेळी म्हणाले.
मुख्यमंत्री फडणवीस दुसरे बाजीराव पेशवे : नाना पटोले यांचे टीकास्त्र

अकोला : राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व दुसरे बाजीराव पेशवे यांचे कृत्य सारखेच आहे. त्यामुळे मुख्यमंत्री फडणवीस दूसरे बाजीराव पेशवे असल्याची टीका अखिल भारतीय कॉंग्रेस किसान सेलचे अध्यक्ष तथा महाराष्ट्र प्रदेश कॉंग्रेसचे प्रचार प्रमुख नाना पटोले यांनी शनिवारी पत्रकार परिषदेत केली आहे. फडणवीस यांच्या सारखा खोटारडा मुख्यमंत्री पहिल्यांदाच बघितल्याचे सुद्धा पटोले यावेळी म्हणाले. 

''सांगली, कोल्हापुरात महापूर आलेला असल्यानंतर सुद्धा मुख्यमंत्री फडणवीस जनतेच्या पैशातून महाजनादेश यात्रा काढण्यात मग्न होते. त्यांना शेतकरी, गरिबांची चिंता नव्हती. भाजपच्या वरिष्ठ नेत्या सुषमा स्वराज यांचे निधन झाल्यानंतर त्यांनी यात्रा थांबविली. त्यानंतर महापूरग्रस्तांना दिलासा देण्यासाठी शासनादेश (जीआर) काढला. त्यामध्ये दोन दिवस शेती पाण्याखाली असल्यास दहा किलाे धान्य व शहरी क्षेत्रातील रहिवाशाचे संसार उपयोगी साहित्य वाहून गेल्यास 7 हजार 500 आणि ग्रामीण क्षेत्रातील रहिवाशासाठी पाच हजार रुपये मदत जाहीर केली. परंतु ज्या व्यक्तीकडे शेतजमीन नाही त्याला कोणत्याही प्रकारची मदत जाहीर केली नाही. त्यामुळे ज्या प्रमाणे दूसऱ्या बाजीराव पेशव्याने बहुजन, गरिबांवर अन्याय केला. त्याच प्रमाणे मुख्यमंत्रांनी काढलेला शासन निर्णय सुद्धा गरिबांसाठी अन्यायकारक आहे. त्यामुळे मुख्यमंत्री फडणवीस व दुसरे बाजीराव पेशवे यांचे कृत्य सारखेच सारखेच आहे," अशी टीका नाना पटोले यांनी केली. 

जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांच्या सेल्डी व्हीडीओ व फोटोसेशनवरही पटोले यांनी भाजपचा समाचार घेतला. राज्याच्या मुख्यमंत्र्यांप्रमाणे इतर मंत्री वागत असल्याची टिका त्यांनी केली. पत्रकार परिषदेला काँग्रेसचे हिदायत पटेल, बबनराव चौधरी, मदन भरगड, लक्ष्मणराव तायडे व इतर नेता उपस्थित होते. 

जनहित याचिका दाखल करणार
पश्चिम महाराष्ट्रातील सांगली, काेल्हापूरसह इतरही ठिकाणच्या पूर परिस्थितीला सरकार जबाबदार आहे, असा आरोप नाना पटोले यांनी यावेळी केला. याप्रकरणी लवकरच न्यायालयात जनहित याचिका दाखल करण्यात येईल, असेही ते म्हणाले. नैसर्गिक आपत्ती व्यवस्थापन कायदा 2005 नुसार सरकार व संबंधित यंत्रणा गुन्हेगार ठरतील, असा दावा नाना पटोले यांनी पूर परिस्थितीवर जनहित याचिकेवर भाष्य करताना केला. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com