मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली 'त्या' अंधश्रद्धेला मुठमाती

शेगाव येथे आजवर सहसा कोणीही मुख्यमंत्री गजानन महाराज यांच्या मंदिरात दर्शनाला जात नव्हते. तेथे गेले की पद जाते किंवा काही तरी आपत्ती येते असे बोलले जात होते.
Devendra Phadanavis Visits Shri Gajanan Maharaj Temple Shegav.j
Devendra Phadanavis Visits Shri Gajanan Maharaj Temple Shegav.j

शेगाव : महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शनिवारी श्री संत गजानन महाराज यांच्या समाधीचे दर्शन घेतल्याने गेल्या अनेक वर्षांपासून लोकांच्या मनात घर करून बसलेल्या 'त्या' अंधश्रद्धेला मुठमाती दिली गेलीआहे.

शेगाव येथे आजवर सहसा कोणीही मुख्यमंत्री गजानन महाराज यांच्या मंदिरात दर्शनाला जात नव्हते. तेथे गेले की पद जाते किंवा काही तरी आपत्ती येते असे बोलले जात होते. बुलढाणा जिल्ह्यातील राजमाता जिजाऊ यांचे जन्मस्थळ सिंदखेडराजा येथे गेल्यावर सुद्धा पद जाते, असा लोकांना गैरसमज होता. मात्र, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे जिजाऊ यांच्या दर्शनासाठी गेले आणि त्यांनी हा विषय आपल्या भाषणात मांडला. त्यानंतर त्यांनी आपली कारकीर्द यशस्वी पूर्ण केली आणि  सिंदखेडराजा बाबतीत असलेल्या अफवांना पूर्ण विराम मिळाला. 

आता त्यानी अश्याच अफवा आणि अंधश्रद्धा झुगारून शेगाव येथील श्री संत गजानन महाराज यांच्या समाधीचे दर्शन घेतले. यावेळी मंत्रोपचारात त्याचे स्वागत झाले. संस्थानचे विश्वस्त नीलकंठदादा पाटील यांनी पूरग्रस्त नागरिकांना मदत म्हणून १ कोटी ११ लक्ष रुपयांचा निधी मुख्यमंत्री यांना दिला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ही भूमिका जनसामान्य माणसाच्या मनात घर करून गेली. पूरग्रस्तांसाठी त्यांनी हे पाऊल उचलत खुळचट कल्पना आणि अंधश्रद्धेला मुठमाती दिली आहे. शे

गाव येथील श्री संत गजानन महाराज संस्थान सेवा, शिस्त आणि स्वच्छता यासाठी देशांत ओळखले जाते. येथे कोणत्याही प्रकारची भोंदूगिरी, लुबाडणूक नाही, विविध ४२ लोकाभिमुख सेवा प्रकल्प राबविण्यात येतात. विशेषतः संस्थान प्रसिद्धी पासून दूर राहते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीने  श्री गजानन महाराज यांच्या भक्तांनी आनंद व्यक्त केला. सोशल मीडियावर हा विषय चांगलाच चर्चेत आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com