विदर्भात पुन्हा एका औष्णिक वीज केंद्राची भर? : मुख्यमंत्र्यांची उमरेड येथे घोषणा

कोळसा खाणी व औष्णिक वीज केंद्रांमुळे विदर्भाचे वातावरण झपाट्याने प्रदूषित होत असताना नागपूर जिल्ह्यातील उमरेड येथे पुन्हा एक नवे औष्णिक वीज केंद्र उभारण्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज केली.
विदर्भात पुन्हा एका औष्णिक वीज केंद्राची भर? : मुख्यमंत्र्यांची उमरेड येथे घोषणा

नागपूर : कोळसा खाणी व औष्णिक वीज केंद्रांमुळे विदर्भाचे वातावरण झपाट्याने प्रदूषित होत असताना नागपूर जिल्ह्यातील उमरेड येथे पुन्हा एक नवे औष्णिक वीज केंद्र उभारण्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज केली.

उमरेड येथे नाट्यगृहाचे उद्‌घाटन मुख्यमंत्र्यांचे हस्ते झाले. यावेळी ते बोलत होते. यावेळी उर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे, आमदार सुधीर पारवे उपस्थित होते. विदर्भात कोळसा खाणी व औष्णिक वीज केंद्रांमुळे विदर्भातील नागपूर, चंद्रपूर, गडचिरोली या जिल्ह्यातील वातावरण प्रदूषित होत आहे. गडचिरोली जिल्ह्यात तर खाणींच्या विरोधात मोठ्या प्रमाणावर आंदोलन सुरू आहे. उमरेड परिसरात दोन ओपन कास्ट कोळसा खाणी आहेत. यामुळे यापरिसरात मोठ्या प्रमाणावर प्रदूषण झालेले आहे. ही वस्तुस्थिती असताना मुख्यमंत्र्यांनी उमरेडमध्ये एक औष्णिक वीज केंद्र सुरू करण्याबद्दल सरकार सकारात्मक असल्याचे आश्‍वासन यावेळी दिले.

गेल्या तीन वर्षांपासून विकासाचे प्रकल्प विदर्भात होत असल्याचा आरोप केला जात आहे. उमरेडमध्ये औष्णिक वीज केंद्राची घोषणा करून पुन्हा विरोधकांच्या हातात कोलित दिले आहे. खापरखेडा व कोराडी येथील औष्णिक वीज प्रकल्पाची काही युनिट बंद केली आहेत. तसेच चंद्रपूर येथील काही युनिट बंद पडली आहेत. पाण्याचा अपुरा पुरवठा व निम्न दर्जाच्या कोळश्‍यामुळे औष्णिक वीज निर्मितीसाठी अडचणी येत आहे. खापरखेडा व कोराडी वीज प्रकल्पांना पाणी देण्यास भाजपचे आमदार मल्लिाकार्जुन रेड्डी (रामटेक) यांनी विरोध केला आहे. या संदर्भात त्यांनी काही दिवसांपूर्वीच जिल्हाधिकारी सचिन कुर्वे यांच्याकडे निवेदन सादर केले आहे. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com