विदर्भातील 118 उमेदवारांना ‘नोटा’पेक्षा कमी मते : गडचिरोलीत सर्वाधिक नोटाला पसंती; ‘त्या’ उमेदवारांना आत्मचिंतनाची गरज

विदर्भातील 118 उमेदवारांना ‘नोटा’पेक्षा कमी मते : गडचिरोलीत सर्वाधिक नोटाला पसंती; ‘त्या’ उमेदवारांना आत्मचिंतनाची गरज

लोकसभा निवडणुकीचे निकाल दोन दिवसाआधी जाहीर झाले. धक्कदायक असे निकाल लागत भाजपची आणखीन वरचढ झाली. या निवडणुकीत विदर्भातून 163 उमेदवार उभे होते. या उमेदवारांपैकी तब्बल 118 उमेदवारांवर ‘नोटा’ वरचढ झाला आहे. या उमेदवारांना मिळालेल्या मतांपेक्षा अधिक मते नोटाला मिळाली आहे. तर गडचिरोली-चिमूर लोकसभा मतदार संघात नोटाला सर्वाधिक पसंती देण्यात आली. त्यामुळे या उमेदवारांना नक्कीच आत्मचिंतनाची गरज असल्याचे दिसून येत आहे.

अकोला : लोकसभा निवडणुकीचे निकाल दोन दिवसाआधी जाहीर झाले. धक्कदायक असे निकाल लागत भाजपची आणखीन वरचढ झाली. या निवडणुकीत विदर्भातून 163 उमेदवार उभे होते. या उमेदवारांपैकी तब्बल 118 उमेदवारांवर ‘नोटा’ वरचढ झाला आहे. या उमेदवारांना मिळालेल्या मतांपेक्षा अधिक मते नोटाला मिळाली आहे. तर गडचिरोली-चिमूर लोकसभा मतदार संघात नोटाला सर्वाधिक पसंती देण्यात आली. त्यामुळे या उमेदवारांना नक्कीच आत्मचिंतनाची गरज असल्याचे दिसून येत आहे.

देशात लोकशाही असल्याने प्रत्येक नागरिकाला देशात कुठेही निवडणूक लढण्याचा अधिकार आहे. मात्र, निवडणुकीत उभ्या असलेल्या उमेदवारांपैकी एकही उमेदवार मतदारांच्या पसंतीस बसत नसल्यास सर्वोच्च न्यायालयाच्या पुढाकाराने देशात होणाऱ्या निवडणुकीत मतदारांना नोटा हा पर्याय, 2013 पासून निवडणूक आयोगाने उपलब्ध करून दिला आहे. 2019 लोकसभा निवडणुकीत पसंतीचा उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात नसल्याने नन ऑफ द अबव्ह (नोटा) चा वापर करणाऱ्या मतदारांच्या संख्येत वाढ होत असल्याचे दिसून येत आहे. विदर्भातील लोकसभा मतदार संघात नोटा वापरणाऱ्या मतदारांची संख्या दुप्पटीने वाढली आहे. 

यंदा विदर्भात दहा लोकसभा मतदार संघात 95 हजार 343 मतदारांनी नोटा वापरल्याने चांगलीच हवा निर्माण केली आहे. यामध्ये गडचिरोली-चिमुर मतदार संघात ‘नोटा’ या पर्यायाला सर्वाधिक 24 हजार 599 जणांना पसंती दिली. या दहा लोकसभा मतदार संघात 163 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उभे होते. यातील तब्बल 118 उमेदवारांना मिळालेल्या मतापेक्षा अधिक मते ही ‘नोटा’ या पर्यायाला मिळाली आहे. त्यामुळे हे उमेदवार दिल्लीत मतदार संघाचे नेतृत्व करण्याच्या कितपत योग्य होते असे सांगने जरी शक्य नसले, तरी मतदारांनी दिलेला कौल नक्कीच या उमेदवारांना आत्मचिंतन करायला लावणारा ठरला आहे. 

नोटापेक्षाही कमी मते असलेले उमेदवार
मतदार संघ                उमेदवार संख्या
अकोला                    8
बुलडाणा                   9
यवतमाळ-वाशीम          16
अमरावती                  18
रामटेक                     12
वर्धा                        10
नागपूर                      26
चंद्रपूर                      9
भंडारा-गोंदिया              9
गडचिरोली-चिमूर          1
एकूण                      118

लोकसभा मतदार संघनिहाय ‘नोटा’चा वापर
मतदार संघ                नोटाला मते
अकोला                    8866
बुलडाणा                   7681
यवतमाळ-वाशीम          3966
अमरावती                  5322
रामटेक                     11920
वर्धा                        6510
नागपूर                      4578
चंद्रपूर                      11377
भंडारा-गोंदिया              10524
गडचिरोली-चिमूर           24599
एकूण                       95343

95 हजार मतदारांनी उभे केले प्रश्नचिन्ह
विदर्भातील 95 हजार 343 मतदारांनी नोटाचा वापर करून सत्ताधारी पक्षाची निराशाजनक कामगिरी, समर्थ विरोधी उमेदवाराचा अभाव, तसेच उमेदवाराची विश्वासार्हता आणि सक्षमतेबद्दल असलेली साशंकता यावर वार केला आहे. तर नक्षलग्रस्त असलेल्या मतदार संघात नोटाला मिळालेली सर्वाधिक मते ही देखील प्रश्नचिन्ह उभी करणारी आहेत.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com